मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ते विठोबा चौक दरम्यान असणाऱ्या (जुनी श्रीराम टाॅकीज) रायसोनी कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या चौकाचे नामकरण संत शिरोमणी रोहिदास महाराज असे करण्यात यावे.
एकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा रविदास व्यापै एकों घट भीतर, सभको एकै घडै कुम्हारा
सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणारा ही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल असे समाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते. त्यांचा समाजवाद ह्या ओळीतूनही दिसून येतो.
हिंगणघाट शहर हे श्रमिकांचे शहर म्हणून ओळखले जाते, शहराच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोणताही श्रमिक स्व:हीत न बाळगता आपला वडीलोपार्जीत असलेला व्यवसाय समोर कसा नेता येईल यावर काम करत गेले, पण आधुनिकतेच्या जगात नव-नवीन क्रांती घडत गेली आणी त्या स्पर्धेत कुठेतरी परिस्थितीमुळे तो व्यवसाय कमी होत गेला, एकेकाळी चर्मकार बांधवांची मोठी बाजारपेठ त्याच चौकात होती, शहराच्या बाजारपेठेत त्यांच योगदान विसरता येणार नाही, आज त्याच चौकाला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. ते आपण त्वरित काढून त्या चौकाला एक जीवनदान देवुन संत शिरोमणी रोहिदास महाराज असं नामकरण करण्यात यावे.
येथुनच हाकेच्या अंतरावर आठवडी बाजारात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे मंदिर सुद्धा आहे, तेव्हा त्यांची जयंती, पुण्यतिथि तथा अन्य धार्मिक कार्यक्रम करतांना अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागतों याकरीता रस्त्यांवरील अतिक्रमण काढून कारंजा चौंक ते सुभाष पुतळा जसा सौंदर्यकरण केला त्याप्रमाणे श्रीसंत शिरोमणी रविदास महाराजांचे चौंकाला नामकरण करुन मुख्य हनुमान मंदिर वार्ड पर्यन्त सौंदर्यकरण करावे अशी मागणी संत रविदास महाराज भक्तमंडळीने हिंगणघाट नगर पालिका मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांचा एका निवेदना द्वारे करण्यात आली.
अन्यथा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा सुरेश गायकवाड मित्रपरिवार व समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला. यावेळी कैलास सुर्यवंशी, शंकर चांदेकर, निखिल हांडे, आदर्श चव्हाण, राहुल भारती, गणेश अखतकर, प्रवीण चांदेकर, आशू सोनकुवर, चरणदास हांडे, विनोद हांडे, जैश मिसारकर, संजय चांदेकर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.