दोन दिवसात आणखी भाजपा कार्यकर्ते देणार राजीनामे.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काल राज्यात मंत्र्यांना शप्पत देण्यात आली. पण अनेक जेष्ठ आमदार नेत्यांना देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नसल्याने भाजपा मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य सुरू आहे. त्यात हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांना मंत्रिपद न दिल्याने हिंगणघाट भाजपमधील पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. समीर कुणावार यांना डावलण्यात आल्याने आता हिंगणघाट येथे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार समीर कुणावार यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा असताना अचानक रात्रीत सूत्रे पालटली असल्याची चर्चा जोर धरते आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार समिर कुणावार यांची मंत्रीपदी वर्णी लागली नसल्याने हिंगणघाट क्षेत्रात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काही पदाधिकाऱ्यांनी आमदार समीर कुणावार याना मंत्रीपदापासून डावलण्यात आले असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील 160 च्या वर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिला. यात जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, तालुकाध्यक्ष आणि समुद्रपूर, सिंदी रेल्वे व हिंगणघाट शहरातील विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्याकडे हे राजीनामे देण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे. आमदार समीर कुणावार यांना मंत्रिपद जवळजवळ निश्चित झाले होते, पण ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले आहे.