अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत वाघोली केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामणी येथील विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका प्रतिभा गुल्हाने यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व नव्वद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून नोटबुक आणि खाऊ म्हणून बिस्किट पुडा व चॉकलेट इत्यादीचे वाटप केले. याशिवाय अंगणवाडीतील छोट्या मुलांना सुद्धा नोटबुक व खाऊचे वाटप केले.
छोटया स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विलास हिवंज तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील शिक्षक दिनेश कावळे, भुषण सावळकर उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील शिक्षकवृंदानी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सौ. गुल्हाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन वर्ग चौथीतील कु.निधी दारोंडे हिने करून आभार वर्ग तिसरीतील कु. मनस्वी वाघमारे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्ग तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.