राज शिर्के, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे महिन्याभऱ्यापूर्वी लग्न झालेल्या हनिमूनला जाण्याच्या वादातून सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिन्याभऱ्यापूर्वी लग्न झालेल्या जावयाला काश्मिरला जायचे होते.. तर सासरा यांचे म्हणणे होते की, मक्का मदीना येथे जा, त्यावरून सासरे आणि जावई या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापलेल्या सासऱ्याने जावयावर असिडने हल्ला केला.
हनिमूनला जाण्यावरून जावई आणि सासऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. जावयाला हनिमूनसाठी काश्मीरला जायचं होतं तर सासर्याने काश्मीरला जाण्यास विरोध करत तू मक्का मदीनाला जा असे जावयाला सांगितलं होतं. याच कारणावरून दोघांमध्ये गेल्या अनेक दिवस वाद सुरू होता. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण लालचौकीजवळ सासऱ्याने जावयाला गाठले त्याने जावयावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जावई ईबाद फालके गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घटनेनंतर आरोपी सासरा जकी खोटाल पसार झालाय . याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासऱ्याचा शोध सुरू केला .
कल्याण पश्चिम परिसरात ईबाद फालके आपल्या कुटुंबासोबत राहतो. महिनाभरापूर्वी याच परिसरात राहणाऱ्या जकी खोटाल याच्या मुलीशी इबादचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर इबादला हनिमूनसाठी काश्मीरला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी तयारी देखील केली. मात्र सासरा जकी खोटाल याने तुम्ही काश्मीरला जाऊ नका, प्रार्थनेसाठी मक्का मदीनाला जा असे जावयाला सांगितले. यावरून जावयी ईबाद व सासरा जकी या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद देखील सुरू होते.
जावई ऐकत नसल्याने जकी संतापला होता. काल सायंकाळी ईबाद लालचौकी परिसरातून घराच्या दिशेने पायी जात असताना जकी रिक्षाने आला त्याने ईबादला गाठले आणि ईबादवर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात ईबाद गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर कल्याण मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. फरार असलेला जकी खोटाल याचा शोध बाजारपेठ पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे कल्याण शहरात एकच खळबळ उडाली.