मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- विधानसभा २०२४ च्या निवडणूकानंतर फक्त सहा दिवसाच्या कालावधी साठी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे नुकतेच संपन्न झाले. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकरिता सरकारने विविध योजनांचा निधी जाहीर करत विकसित राज्याची आगामी धोरण निश्चित केली.
शिवसेना पक्षाच्या वतीने रवी धोटे, उपजिल्हा प्रमुख हिंगणघाट – समुद्रपूर विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही विशेष व महत्त्वपूर्ण मागण्यांना घेऊन निवेदन 21 डिसेंबर रोजी देवगिरी बंगल्यावर देण्यात आले. अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीची भरपाई पिक विमा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावरील पांधन रस्ते हा उपक्रम अभियान स्वरूपात राज्य सरकारने राबवावा जेणेकरून शेतकऱ्यांना पावसाळी काळात शेतावर जाणे सुलभ होईल. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची व्यस्थता लक्षात घेता निवेदन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्वीकारले व विषयाचे मौखिकरित्या समाधान देखील केले.
त्यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख महेश मुडे, शिवसेना शहर प्रमुख हिंग, प्रशांत लहामगे, उपशहर प्रमुख राहुल टेंभूर्णे, शहर प्रमुख समुद्रपूर, गिरधर ठवरी, ग्रा.पंचायत सदस्य आकाश राऊत, शिवसेना पदाधिकारी अमित काळे,मदन खेमये, सुरज सोनटक्के, पांडुरंग राऊत, आतिश सातपुते, दिनेश काटकर, गणेश हिवरकर उपस्थित होते.