अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली सोकावलेली गर्दी समाजात तयार होतांना दिसतेय युवकांसोबतच वडीलधारी मंडळी सुद्धा पवित्र संस्कारांचे इव्हेण्ट करून परंपरा मोडीत काढत आहेत मग पुढील पिढीला आपण नक्की काय देणार, या विचारावर मंथन करून कौटुंबिक प्रबोधनाचा, जाणिवांचा जागर करण्यासाठी अभिनव विचार मंचाने स्व. जनार्धनजी निखाडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 25 डिसेबंर 2024 ला सांयकाळी 5.00 वाजता स्थानिक निखाडे मंगल कार्यालय नंदोरी रोड येथे करण्यात आले आहे.
सदर कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाला मोर्शी, अमरावती येथिल प्रमुख वक्ते म्हणुन लाखो युवकाचे प्रेरणास्थान, प्रखर विचारवंत, युवा कीर्तनकार, ख्यातनाम वक्ते सोपानदादा कनेरकर मार्गदर्शन करणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. यवतमाळ अर्बन को- ऑ. बँक लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे उपस्थित राहणार आहे. तसेच यावेळी आमदार समीर कुणावार व निखाडे परीवाराचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाला सहपरीवार राहावे असे आवाहन अभिनव विचार मंच ने केले आहे.