श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्यात आगोदरच कायदा व सुव्यवस्था धिंडोले निघत असताना बीड पोलीस विभागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातून तब्बल 10 बॅटऱ्यांची चोरी झाली. विशेष म्हणजे, या बॅटऱ्या पोलिसानेच चोरल्या आहे. त्यामुळे बीड येथे रक्षकच बनला चोर अशा चर्चेला उधाण आले आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयातून तब्बल 10 चोरल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सहायक फौजदार व दुकानदार यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. अमित मधुकर सुतार रा.खोकरमोहा ता. शिरूरकासार व माधव गोरक्षनाथ जानकर रा. वडगाव गुंदा ता. बीड असे आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात कार्यरत असलेले सहायक फौजदार अमित सुतार यांनी नोव्हेंबर महिन्यात तीन बॅटऱ्या चोरी केल्या होत्या. त्यानंतर त्या चोरीच्या बॅटऱ्या माधव जानकार या दुकानदाराला विकल्या. त्यानंतर परत अमित सुतार याने 25 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास अजून 7 बॅटऱ्यांची चोरी केली. पण त्यांच्या चोरीचे बिंग फुटले आणि त्यांस रंगेहाथ बॅटऱ्या चोरी करून विकताना अटक करण्यात आली.
या चोरीची पोलिस उपनिरीक्षक बाबुलाल यल्लाप्पा जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड, कर्मचारी अशपाक सय्यद, परजणे हे करत आहेत. सध्या हे दोघेही ताब्यात असल्याचे माहिती मिळून आली आहे.