संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुराचे अध्यक्ष तथा सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थे अंतर्गत शाळा, महाविद्याल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेतील शाळा, महाविद्यालये आणि धोटे परिवाराच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना सुदृढ दिर्घ आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, उद्घाटक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक प्रदीप धोटे, मोहसीन अली बंदाली, सौ. शुभांगी धोटे, सौ. कल्याणी धोटे, प्राचार्य संतोष शिंदे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, प्रा. प्रफुल्ल शेंडे, प्रा. समिर पठाण, यासह संस्थे अंतर्गत शाळा, महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.