आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी घटनेत वाढ झाली आहे. शुल्लक कारणावरून हत्या होत असल्यामुळे पोलिसांचा वचप गुन्हेगारांवर आहे की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात अजून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत असताना हटकल्याचा राग आल्यानं 6 जनांनी सुरक्षासाठी तैनात असलेल्या रक्षकसह त्याच्या पत्नीला दगड व हाताने मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेल नजीक शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी रात्री 8.00 वाजताच्या दरम्यान घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयांमध्ये आज बुधवार 1जानेवारी रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल अक्षय चव्हाण वय 30 वर्ष, रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता. हवेली असे मृतक महिलाचे नाव आहे.
या गुन्ह्यात पोलिसांनी सतीश बारीकराव लोखंडे वय 31 वर्ष, अजय दशरथ मुंढे वय 26 वर्ष, भानुदास दत्तात्रय शेलार वय 32 वर्ष सर्व राह. चिंबळी फाटा, तालु. खेड, जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे 3 साथीदार आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. याप्रकरणी अक्षय साहेबराव चव्हाण वय 31 वर्ष यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय चव्हाण हे आपल्या कुटुंबासमवेत थेऊर येथील चव्हाणवस्ती परिसरात राहतात. ते थेऊर येथील एका प्लॉटिंगवर वॉचमन म्हणून काम करतात. शुक्रवारी फॉर्च्यूनर चार चाकी कार मधून 6 जन आले व अक्षय चव्हाण हे काम करीत असलेल्या प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करु लागले. त्यामुळे अक्षय चव्हाण यांनी त्यांना हटकले. यामुळे चिडलेल्या आरोपींनी अक्षय चव्हाण व शीतल चव्हाण या पती-पत्नीला दगड व हाताने मारहाण करून हवेत गोळीबार केला. त्यानंतर सर्वजण गाडीतून केसनंदच्या दिशेने निघून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी जखमी झालेल्या शीतल चव्हाण यांना तत्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी त्वरित तपासाची सूत्रे फिरवून आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके तयार करून पाठविली. या घटनेची माहिती लोणीकंद व गुन्हे शाखा यूनिटला दिली.
पुणे गुन्हे शाखा यूनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलिसांची पथके तत्काळ लोणीकंद तपास पथक व गुन्हे शाखच्या पाालसाना सापळा रचून मोठ्या शिताफीने फॉर्च्यूनर गाडी अडविली. गाडीतील आरोपी सतीश लोखंडे, अजय मुंढे व भानुदास शेलार यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्टल व काही काडतुसे जप्त केली आहेत. यावेळी त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.
या मारहाणीत शीतल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांना लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शीतल चव्हाण यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर आज 1 जानेवारी रोजी मालवली.