प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- स्थानिक रेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या सभेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गणेशनगर वासीयांना आश्र्वासन दिले. गणेश नगर मधील शिष्टमंडळाने मागील अनेक वर्षापासून रोडचे निवेदन आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिले होते. त्या गोष्टीचा पाठपुरावा करीत गणेश नगर वासियांनी रेस्ट हाऊस येथे राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेतली असता, अपूर्ण असलेले रोडचे काम लवकरात लवकर सुरु करण्याबाबत आश्वासन दिले.
यावेळी शिष्टमंडळाने राज्यमंत्री या पदावर निवड झाल्याबद्दल आमदार डॉ. पंकज भोयर यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता राधेश्याम पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल उगेमुगे, नीलिमा कटाईत व पुंडलिक पोराटे, सुरेश इखार, विलायतकर, चौधरी, मंदा पोराटे, रघुनाथ पिंपळकर, हनुमान पिसे, अभय कुंभारे व गणेश नगरातील रहिवासी उपस्थित होते.

