Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

महात्मा गांधी यांच्या कर्मभूमित सेवा दिल्याचा आनंद: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 4, 2025
in वर्धा, विदर्भ
0 0
0
महात्मा गांधी यांच्या कर्मभूमित सेवा दिल्याचा आनंद: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या सहकार्याने विकासाला गती मिळाली. स्वागत व सत्कार समारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.03:- जिल्ह्यात गेल्या दोन अडीच वर्षात शासनाच्या विविध योजना, धोरणात्मक निर्णय, शासकीय व अशासकीय कार्यक्रम, लोकसभा व विधानसभा निवडणूक चांगल्या पध्दतीने पूर्ण करण्यास सर्व यंत्रणांनी महत्वाची भुमिका बजावून समन्वयाने कामे केल्याने जिल्ह्यात उत्तम प्रशासन ठेवण्यास मदत मिळाली. यामुळेच राष्टापिता महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत काम करण्याचा अधिक आनंद आहे, असे मनोगत तत्कालीन जिल्हाधिकारी व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांनी स्वागत व सत्कार समारंभ प्रसंगी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे स्वागत व तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निरोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी वान्मथी सी. होत्या. उपवनसरंक्षक हरविंद सिंग, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी रवैय्या डोंगरे, परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार आदी उपस्थित होते.

भारतीय प्रशासन सेवेत रुजु झाल्यापासुन गेल्या नऊ वर्षातील कार्यकाळात विविध जिल्हयात केलेल्या कामकाजात वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचे, अधिकारी व कर्मचा-याचे चांगले सहकार्य मिळाल्यामुळे चांगली कामे करण्याची संधी मिळाली हे कायमस्वरुपी स्मरणात राहील. त्यामुळे जिल्ह्यातील कृषि क्षेत्रातील स्ट्रॉबेरी क्षेत्र, रेशिम क्षेत्र वाढविण्यास मदत मिळाली असून त्याचबरोबर वनराई बंधारे, धामनदी स्वच्छता उपक्रम यशस्वी करण्यास मदत मिळाली असल्याचे राहुल कर्डिले म्हणाले. विदर्भात पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्यास नक्कीच परत येईल असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून अपघात स्थळाची निवड करुन रस्ता सुरक्षा बाबत कार्यवाही करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी झाले असल्याचे यावेळी त्यांनी आर्वजून सांगितले. जिल्ह्यात चांगले व यशस्वी उपक्रम राबविणारे जिल्हाधिकारी म्हणुन राज्यात राहुल कर्डिले यांची ओळख आहे. लोकांसोबत लोकांमध्ये जाऊन प्रशासकीय अधिका-यांसोबत कोणत्याही प्रकारची कटूता न निर्माण होऊ देता कामे करण्याची त्यांची शैली वाखान्याजोगी आहे. प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी येणा-या प्रत्येक नागरिकांना सौजन्याची वागणूक देऊन वेळेत कामे पूर्ण करावी. शासकीय कामांमध्ये कुठल्याची प्रकारची कुचराही खपवून घेतली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या.


सामान्य माणसासोबत राहून काम करण्याची भावना असलेले राहूल कर्डिले यांनी सामान्य माणसाला सेवा देणे हे ध्येय ठेवून सेवादूत प्रकल्प यशस्वी राबविला तसेच ई-सेवा ऑफीस प्रकल्प जिल्हास्तरावरुन गावपातळीवर सुरु करण्यात आला असल्याचे नरेंद्र फुलझेले म्हणाले.
यावेळी हरविंद सिंग, राहुल चव्हाण, रवैय्या डोंगरे, सुरज गोहाड, शिवराज पडोळे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध विभागाच्यावतीने राहुल कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार अतुल रासपायले यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Tags: Wardhaजिल्हाधिकारी वान्मथी सी.
Previous Post

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयवेडे व्हा: मनोज गभने ठाणेदार हिंगणघाट

Next Post

आशिष पर्वत मित्र परिवार व भाजपा कडून लाडू तुला करून आमदार समीर कुणावर यांना दिल्या शुभेच्छा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आशिष पर्वत मित्र परिवार व भाजपा कडून लाडू तुला करून आमदार समीर कुणावर यांना दिल्या शुभेच्छा.

आशिष पर्वत मित्र परिवार व भाजपा कडून लाडू तुला करून आमदार समीर कुणावर यांना दिल्या शुभेच्छा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In