अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांनी तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करत हॅट्रिक प्राप्त केली आहे. यानिमित्त त्यांच्या वाढदिवस असताना शहरातील सुभाष चौकात लाडू तुला करून अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषास साजरा करण्यात आला.
विधानसभा क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यानी वाढदिवसा निमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या तर अनेक ठिकाणी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सुभाष चौक या ठिकाणी भाजपा आणि आशिष पर्वत मित्रपरिवार कडून समीरभाऊ कुणावर त्यानिमित्य लाडू तुला करून वाढदिवसा साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्याच्यी भव्य अशी आतिशबाजी व ढोल ताशाच्या गजरात वाढदिवसा निमित्त आमदार समीरभाऊ कुणावर यांची लाडू तुला करण्यात आली.
यावेळी अषीश प मित्रपरिवार व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिनेश वर्मा, अनिल गैरवार, भास्कर शेंडे, चंदू माळवे, अमोल राऊत, धनेश्वर भागवते राजेश मकरंद धनश्री माळवे, सागर अंडरस्कर, दीपक धामसे, विजय धुमाळे यांनी अथक परिश्रम घेतले.

