कथावाचिक देवी मंजुलता (अयोध्या) यांनी शिव महापूराण कथेचे सांगितले महत्व.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री साई प्रतिष्ठान हिंगणघाट द्वारा आयोजित श्री संत साईबाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिन तसेच राजयोगी श्री संत लक्ष्मी माताजी यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री शिव महापुराण कथेचे आयोजन श्री साई मंदिर नंदोरी रोड येथे करण्यात आले. कथा भागवत्ताचार्य देवी मंजूलताजी (अयोध्या) यांच्या ओजस्वी वाणीतून श्रोत्यांना श्री शिव महापुराण कथेचे महत्व सांगितले. शिवमहापुराण भगवान शंकर आणि त्यांचा अवताराशी निगडित आहे. शिव भक्ती, शिव महिमा आणि शिवाचे संपूर्ण जीवन चरित्र वर्णित त्यांनी सांगितले. त्याच बरोबर ज्ञान, मोक्ष, उपास, तप, जप यांचा मिळणाऱ्या फळांचे देखील महत्व कथा भागवताचार्य देवी मंजुलताजी (अयोध्या) यांनी सांगितले. ३ जानेवारीला महाप्रसादाने शिव महापूराण कथेची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर महाराज, सचिव अतुल वांदिले, प्रा.किशोर शेंगोकार, वामनराव गिरी, चावट सर, कुकडे सर, अविनाश बुरीले, संजय हावगे, दविले सर, भाऊरावजी कोटकर, रमेश गोहाडे, शंकरराव देशमुख, मधुकर खडसे, राजू सिन्हा, प्रदीप चव्हाण, विजय राडे, किशोर गोठे, प्रकाश रघाटाटे आदींनी सहकार्य केले.

