अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला.
सावित्रीबाई फुले या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. त्यांचा असा विश्वास होता की, शिक्षण हे नैराश्यग्रस्त वर्गाला सक्षम बनविण्याचे आणि महिलांना समाजाच्या इतर भागांबरोबर समानतेने उभे करण्याचे एकमेव माध्यम आहे आणि याच विश्वासाने त्यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेचा प्रखर रोष पत्करुन स्रीयांना शिक्षण दिले असे विचार शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण आणि साक्षरता क्षेत्रात महिलांच्या उन्नतीसाठी शिक्षण नावाची क्रांतिकारक ज्योत पेटवीली त्यामुळेच स्त्रीयां आज विविध क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे मत विधानसभा उपाध्यक्षा विद्या गिरी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभूळकर, जिल्हा उपाध्यक्षा मिना सोनटक्के, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, शहर उपाध्यक्षा दिपाली रंगारी, शहर सरचिटणीस सविता गिरी, ओबीसी शहराध्यक्ष आचल वकील, नालंदा राऊत आदी उपस्थित होत्या.

