महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गुजरात:- सोशल मीडियाच्या अती वापरामुळे आज अनेक लहान मुलावर दुष्परिणाम दिसून येत आहे. या सोशल मीडिया इंस्टाग्राम वरून एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने 10 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकले त्यानंतर मुलीचे अपहरण करून घरातून पळ काढला पण या मुलीवर या 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार गुजरात राज्यातील अरवली येतून समोर आला आहे.
5 व्या वर्गात शिकणारी एक मुलगी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली. त्यानंतर या 16 वर्षाच्या मुलाने मुलीचे अपहरण करून घरातून पळ काढला पण या मुलीवर या 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 31 डिसेंबरची असून हे प्रकरण आज समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अरवली जिल्ह्यातील धनसुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील एका 10 वर्षीय मुलीच्या अपहरणाची तक्रार धनसुरा पोलिस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती. पीडित मुलगी आणि तिची अल्पवयीन बहीण त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर इन्स्टाग्राम वापरत होत्या. दोन्ही बहिणींची एकूण 7 इंस्टाग्राम खाती तयार करण्यात आली होती, त्यापैकी 5 खाती बंद आहेत आणि 2 सुरू आहेत. यावरूनच ही मुलगी या अल्पवयीन मुलाच्या संपर्कात होती.
बलात्काराचा आरोप : तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलाने मुलीचे अपहरण केले आणि तिला सोबत नेले. 16 वर्षाच्या मुलाने 10 वर्षाच्या मुलीवरही बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणीही केली असून अल्पवयीन मुलाला मेहसाणा बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

