मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन वर्धा:- जिल्हात दारू बंदी आहे. तरी पण मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी, देशी आणि विदेशी दारूची तस्करी करून हे दारू तस्कर मोठ्या प्रमाणात दारू विक्री करत असल्याने वर्धा जिल्हात शासनाने दारू बंदी करून काय साध्य झालं आहे. हे कुणीही सांगू शकत नाही. या दारू बंदीमुळे पोलिसांवर कारवाईचा नाहक तान वाढला आहे. तर काही पोलिसवाल्यानी यातून मोठी मोहमाया जमवली असल्याची चर्चा आहे. त्यात जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकी गाडीचा पोलिसांनी पाठलाग करत असताना दोघांचा अपघाताच जागीच मृत्यू झाल्याने वर्धा जिल्हात असलेली दारू बंदी अजून किती बळी घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिंदी रेल्वे पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या दुचाकी मोपेडचा पाठलाग करत असताना दारूचा माल भरलेली भरधाव मोपेडने आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने भिषण अपघातात दोन दारू तस्कराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 9 जानेवारी रोजी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास आमगांव फाट्याजवळील अजमेरी ढाब्यासमोर घडली. या भीषण अपघातात दया उर्फ वैभव हेमराज राऊत वय 22 वर्ष रा. वडगांव ह्याचा जागीच तर आलोक संतलाल उईके वय 20 वर्ष रा. कोथीवाडा, सेलू यांचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, सुझुकी कंपनीच्या बर्गमॅन मोपेडने दोन्ही तरुण अवैधरित्या दारुची वाहतूक करीत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी दारूची वाहतूक करणाऱ्या मोपेडचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू केला. यावेळी भरधाव मोपेडच्या चालकाने मागे वळून पाहत असताना अचानक समोर आलेल्या आयशर ट्रकवर मोपेड जोरात धडकली आणि भिषण अपघात आमगांव फाट्याजवळील अजमेरी ढाब्यासमोर झाला. यामध्ये दया उर्फ वैभव हेमराज राऊत ह्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी आलोक संतलाल उईके ह्याचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अपघातात दोन्ही मृतकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. सदर अपघातानंतर रस्त्यावर दारुच्या बाटलांचा अक्षरशः सडा पडल्याचे विदारक चित्र निर्माण झाले होते. अपघातानंतर दोन्ही मृतकाचे शव सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.