अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १२ जाने:- सावनेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानामध्ये मासाहेब जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम जय शिवाजी सामाजीक संस्था सावनेर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता ढोबळे, ठाकरेताई, नयना ठाकरे जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा यांनी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या अफाट कर्तुत्वावर त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ यांनी बालवयापासून निर्माण केली आणि एक नव्हे तर दोन दोन छत्रपती जिजाऊंनी घडविले म्हणून जिजाऊंना प्रत्येक स्त्रियांनी जिजाऊंचा आदर्श आपल्या जीवनात घेऊन त्या दिशेने स्त्रियांनी वाटचाल करावी तरच भावी पिढी स्वाभिमानी निपजेल असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट ते घर झालं सपाट असे म्हणणारे आमचे संभाजी ब्रिगेड अनील घंटे यांनी आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजां सारख्या संतांच्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारधारेतून निर्माण झालेले साहित्य वाचून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवावं ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचे अभंग किर्तन ऐकून आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष कृती करून त्यांनी रयतेच्या राज्य निर्माण केलं आजची भावी पिढी मात्र त्या दिशेला या विचाराला न स्वीकारता केवळ भंपकबाजी आणि टीव्ही मोबाईलवर आपला वेळ व्यर्थ वाया घालत आहे यावर भावी पिढीने आणि त्यांच्या मातापित्यांनी लक्ष देऊन एक संस्कारी पिढी घडवावी तरच देश राज्य कुटुंब सुखी होईल असे त्यांनी या ठिकाणी प्रतिपादन व्यक्त केल.
जिजाऊंचा आदर्श आज प्रत्येक स्त्रियांनी आपल्या जीवनामध्ये घेऊन येणाऱ्या पिढीला घडवण्याचं काम महिलांनी करणं अत्यंत आजच्या पिढीसाठी गरजेचे आहे शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात नको ही मनोवृत्ती जोपर्यंत सोडणार नाही आणि शिवाजी जन्माला यावे ते फक्त माझ्याच घरात ही वृत्ती जोपर्यंत महिला अंगीकारणार नाही तोपर्यंत या देशातील जनतेला कुणीही न्याय देऊ शकणार नाही म्हणून जिजाऊंचा आदर्श आपल्या जीवनात सर्व महिलांनी जिजाऊंचा आदर्श अंगी करावा असे प्रतिपादन जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाला आवर्जून गेंदराम जीचकार, राजीव खेकारे, योगेश खुरपडे, अनिल ठाकूर, राजू सोनटक्के, सुधाकर ढोबळे, कल्पना ठाकरे, रमेश वानखेडे, नरेंद्र पाटील, गणपती पठाने, रवी ठाकरे, दादाराव लांजेवार, शिवाजी धमधर, सुभाष इंगोले , कांचन ढवंगाळे, गजानन धांडे, दीपक भुडके, ज्ञानेश्वर ढोके, बागडे साहेब आदी उपस्थित होते. यावेळी जिजाऊ वंदना करून तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय हा जयघोष म्हणून म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

