संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राज्यात आरोग्य व्यवस्था किती मग्रूर आहे. याचे उदाहरण परत एकदा समोर आले आहे. अपघातग्रस्त रुग्णाला गोल्डन अवर्स पहिला एक तास खूप महत्वाचा असतो पण चंद्रपूर जिल्हातील आरोग्य व्यवस्था भयंकर रूप बघायला मिळले. येथे एकाचा अपघात झाला असताना प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा येते उपचारासाठी नेण्यात आले असताना पण रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा येते दोन रुग्णवाहिका उपलब्ध असताना डॉक्टरांनी त्या या गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला उपलब्ध करून दिल्या नाही. राजुरा तालुक्यातील देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे रुग्णांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
प्राप्त माहितीनुसार, आतम कंठीराम राठोड यांचा आज दिनांक 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7.00 वाजता अपघात झाला. त्याला प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा येथे दाखल केले. अपघातग्रस्त रुग्ण गंभीर असल्याचे कर्त्यव्यावर असलेले डॉ. वाच्छालवर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दोन रुग्णवाहिका उपलब्ध असताना सुद्धा डॉक्टरांनी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे अखेर अपघातग्रस्त रुग्णाला नातेवाईकांनी छोटा हत्तीमध्ये टाकून राजुरा येथे उपचारार्थ आणले.
येथे आणल्यावर प्राथमिक उपचार करून रुग्णाच्या डोक्याला गंभीर जखम असल्याने चंद्रपूर येथे उपचारासाठी पटविण्यात आले. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी कसूर केल्याने बराच वेळ निघून गेल्याने गंभीर रुग्णावर उपचार होण्यास विलंब झाला असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर वर वेळीच कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी आता रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातून स्थानिक परिसरातील नागरिकांना योग्यवेळी आवश्यक उपचार तसेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांची आवश्यक व नैतिक जबाबदारी असतानाही तसेच देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन रूग्णावाहीका उपलब्ध असतानाही डॉक्टरांनी अपघातग्रस्त राठोड यांना रूग्णावाहीका उपलब्ध असताना ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून रुग्णाच्या जीवाचे बरेवाईट झाले असते तर याला सर्वस्वी हे डॉक्टर महाशयच जबाबदार असते त्यामुळे अत्यावश्यक सेवा देण्यात कसुरवार डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करून धडा शिकवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.