पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे
दि. १६/०५/२०२२ रोजी एका महिला फिर्यादीचे व्हॉटसअपच्या माध्यमातुन अश्लिल व्हिडीओ कॉल करून विनयभंग करणा-या एका अनोळखी मोबाईलनंबर धारक व्यक्तीविरुध्द वारजे पोलीस ठाणेस गु.र.नं १७६/२०२२ भादंवि कलम ३५४ (अ), ३५४ ( उ ) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७.६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील संशईत आरोपीचा प्राप्त मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस अंमलदार, नितीन कातुर्डे व ज्ञानेश्वर गुजर यांनी तपास पथकाचे अधिकारी रामेश्वर पावें व त्यांचे स्टाफ यांनी शिरुर येथे जावुन दाखल गुन्हयातील मोबाईल नंबर धारक / वापरकर्ता आरोपी नामे- सुधिर बापु कंधारे वय २० वर्ष, रा. तरडोबाची वाडी, शिरूर पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक, गुन्हे, दत्ताराम बागवे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. श्री. राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती पौर्णिमा गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. पुणे शहर, मा. श्रीमती रुक्मिणी गलंडे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक गुन्हे, दत्ताराम बागवे व तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक, नरेंद्र मुळे, पोलीस उप-निरीक्षक, पायें, पोलीस उप-निरीक्षक अमोल सावंत, पोलीस अंमलदार, प्रदिप शेलार, हनमंत मासाळ, धनंजय गिरीगोसावी ज्ञानेश्वर गुजर, नितीन कालु व वारजे पोलीस ठाणेकडील इतर स्टाफने केली आहे.

