पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधी
डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर
दिनांक २६/०९/२०२२ रोजी डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लकडी पुल व झेड ब्रिजच्या मध्ये मुठा नदीच्या बाजुला असलेल्या नदीपात्र परिसरात अनोळखी इसम बेशुद्ध व जखनी अवस्थेत पडला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहिती प्राप्त होताच तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर करपे व डेक्कन पोलीस ठाणेकडील इतर स्टाफ असे रवाना झाले. सदर इसमास कोणीतरी अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी वार करून जिवे ठार मारले आहे.
मयत इसमाचे वडील यांच्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाणे येथे गु.र.नं १३० / २०२२ भादवि ३०२ अन्वये अज्ञात मारेक-याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयत इसमास व मारेकरी यांना पाहणारे साक्षीदार व सीसीटीव्ही याद्वारे प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित आरोपी नामे १) नरेश गणेश दळवी वय ३० वर्षे २) अजय शंकर ठाकर वय २५ वर्षे, ३) समीर कलास कारके चय २६ वर्षे, सर्व रा. मु.पो. उसे, ता. मावळ, जि.पुणे यांचा त्यांचे राहते परिसरातुन ताब्यात घेतले. आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली आहे. आरोपीनां नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात कलम १२०(ब) मादवि सह कलम ३७ सह १३५ मु.पो. कायदा अन्वये कलमवाद करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास सपोनि चोरमले करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. राजद्रे डहाळे सो अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मा. डॉ. प्रियांका नारनवरे मॅडम, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ पुणे शहर, मा. श्री रमाकांत माने सो, सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मुरलीधर करपे यांचे अधिपत्याखाली डेक्कन पोलीस ठाणेकडील तपास पथकातील सपोफौ. दत्ता शिंदे,सपोनी कल्याणी पडोळे, हवालदार महेश बोरसे, पोलिसनाईक बाळासाहेब भांगले , पोलिस नाईक विनय बडगे आणि पोलिस नाईक संतोषबोरकर यांनी अतिशय कौशल्याने तपास करुन खुनासारख्या गंभीर गुन्हयातील अज्ञात असलेल्या आरोपीच्या २४ तासाच्या आत अटक करुन गुन्हा उघडकीस आणला.

