Monday, May 25, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल मिळणार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 28, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल मिळणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक : राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, बागलाण व नांदगाव तालुक्यातील प्रत्येकी 400 विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. कोरोना संपल्यानंतर आता राज्य शासनाच्या नियोजन विभागाने 16 फेब्रुवारी 2022 रोजी सायकल वाटपाचे आदेश दिले आहेत. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या परंतु, शाळेपासून पाच किलो मिटर अंतरावर राहणार्‍या गरजू मुलींना प्राधान्याने सायकलींचे वाटप केले जाणार आहे. लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सायकल वाटप केले जाणार नसले तरी सायकल खरेदीसाठी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान देण्याची प्रक्रिया माध्यमिक शिक्षण विभागाने सुरु केली आहे. जिल्हा नियोजन अधिकार्‍यांकडे निधीची मागणी केली असून, त्यांनी मंजूरी दिल्यानंतर निधी वितरीत केला जाणार आहे.

असे मिळेल अनुदान

पहिल्या टप्प्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात साडेतीन हजार रुपये पाठवले जातील. दुसर्‍या टप्प्यात त्यांनी सायकल खरेदी करावी. सायकल खरेदी पावती दाखवल्यानंतर उर्वरित 1500 रुपये बँक खात्यावर जमा होतील. या योजनेत शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येईल. डोंगराळ व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे.

Previous Post

व्हॉटसअपच्या माध्यमातुन अश्लिल व्हिडीओ कॉल करुन विनयभंग करणा-या आरोपीस ठोकल्या बेडया…

Next Post

संगमनेर: तालुक्यातील घारगाव ते कोठे बुद्रुक येथे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर: तालुक्यातील घारगाव ते कोठे बुद्रुक येथे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे.

संगमनेर: तालुक्यातील घारगाव ते कोठे बुद्रुक येथे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In