आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी उचलली समाधानकारक पावले.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २० जाने:- आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी १७ जानेवारीला नगर परिषद सावनेर येथे जनता दरबार व आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये विविध शासकीय विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते. स्थानिक व तालुक्यातील लोकांच्या समस्या लेखी स्वरूपात घेण्यात आल्या. त्यांनतर प्रत्येक समस्या वाचून संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिले.
आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी यावेळी बोलताना अनेक समस्यांवर उपाययोजना सांगितल्या. गुंठेवारी प्रकरणे निकाली काढणे, अवैध धंद्यांवर आळा घालणे, कॅन्सर निदान व उपचार मोहीम राबविणे, गुन्हेगारी नियंत्रणासाठी शहरात CCTV कॅमेरे लावणे, पाण्याची समस्या सोडवणे, सार्वजनिक वाचनालय, व्यायाम शाळा, बगीचे अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन करून उपयुक्त आदेश संबंधितांना दिले.
कोर्टाच्या इमारत बांधकामाकरीता ४४ करोड रुपये मंजूर केले आहेत. चांगली पिढी घडविण्याकरिता वाचनालयामध्ये चांगली पुस्तके उपलब्ध करून देणार आहे. व्यायाम शाळेसाठी अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून देणार आहे तसेच चांगल्या बगीच्यांची निर्मिती करणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
गुंठेवारी प्रकरणे निकाली काढत नसल्याच्या तक्रारी, छोटया भाजीपाला व्यवसाईकांना मागे मोठ्यांना पुढे व जागा दिल्याच्या तक्रारी, शहरात वाढत असलेले अतिक्रमण, पालिकेला लिजधारक किंवा टॅक्स देणाऱ्या व्यापाऱ्याजवळून पालिकेद्वारे बळजबरीने बाजार चिट्ठी घेत असल्याच्या तक्रारी, नालीतून सांडपाणी वाहून न जाणे, पुतळे व बागिचे स्वच्छ न होता त्याचे बिल लाखात काढणे, प्रशस्त वाचनालय व व्यायाम शाळेची मागणी, अवरूद्ध रस्ते, नाली सफाई न होणे, सायंकाळी झाडण्यात न येणे, अर्धवट राहिलेले चिकन मार्केट हटविणे, जुना धन्यगंज येथे बागिचा निर्माण करणे, व्यापारी संघाद्वारे शहरातील सर्व न.प. संकुलचे निकामी झालेले जुने गाळे तोडून नविन गाळे तयार करून देणे. खापा रोडवर स्पीड ब्रेकर तयार करणे व लगतच्या नालीवर झाकणे बसविणे, शहरात डस्टींग मशीन आणणे व त्याद्वारे धुळ साफ करणे, वडार मोहल्यात नळ बसविणे, अपंग मुलीला उपजिविकेसाठी डॉ. आशिष देशमुख यांच्या मार्फत ई-रिक्षाची व्यवस्था करून देणे, साई मंदीर परिसरातील रोड निर्माण करणे, लेआऊट मध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी, होळी चौक व धन्यगंज परिसरात नविन डी.पी. लावण्याची मागणी, न.प. मधील जुने रेकॉर्ड संगणकीकृत करणे, तहसिल कार्यालय संबंधातील शेतकऱ्याची विहीर हडपल्याची तक्रार, एसटी बसेस कमी असल्याने त्या वाढविण्यासंबंधी निवेदन अशा अनेक विषयांवर तक्रारी व निवेदन यावेळी चर्चिल्या गेले.
एकूणच अनेक समस्या जनतेने आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या समोर मांडल्या. यावर आ. डॉ. देशमुख यांनी सर्व अधिकारी व कर्मचा-यांना या समस्यांवर तोडगा काढण्यासंबंधी सूचना दिल्या.
आजपर्यत झालेल्या जनता दरबारापैकी हा पहिला जनता दरबार होता जो पुर्णवेळ, शेवटपर्यंत चालला. लोकांच्या समस्या निवारणार्थ आमदार डॉ आशिष देशमुख यांनी समाधानकारक पावले उचलल्याचे यावेळी बोलल्या जात आहे. यावेळी सावनेर पालिका मुख्य अधिकारी बागडे, माजी न.प. अध्यक्ष अँड अरविंद लोधी, सावनेर उपविभागिय अधिकारी संपत खलाटे, डॉ.विजय धोटे, अँड.प्रकाश टेकाडे, अशोक धोटे, रामराव मोवाडे, मंदार मंगळे, राजु घुगल, तुषार उमाटे, सुजीत बागडे, दिवाकर नारेकर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

