डॉ. आयुश्री आशिषराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रम संपन्न.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 20 जाने:- सावनेर येथे 19 जानेवारीला शहरातील अग्रणी सामाजिक संस्था, समर्पण फाउंडेशन व वित्तेश्वर महिलां पत संस्था यांचा भव्य हळदी-कुंकवाचा कार्यक्रम शहरातील महिलांच्या उपस्थितीत मोठ्या हर्षाने पार पडला. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात डॉ. आयुश्री आशिष देशमुख आपले मनोगत व्यक्त करताना महिलांच्या अनेक समस्या कश्या असतात आणि त्यावर कश्या उपाययोजना कराव्या याबद्दल मार्गदर्शन केले. संपूर्ण सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्र कॅन्सर मुक्त करण्यासाठी गावागावात डॉक्टरांची टीम तपासणी करणार असे सांगितले. मकरसंक्रांतचे महत्व आणि शेवटी बोलताना त्यांनी आम्ही सावनेर- कळमेश्वर क्षेत्राला विकासकामात मागे पडू न देता सतत विकासकार्य करू अशी ग्वाही दिली.
यावेळी समर्पण फाउंडेशनचे PACK YOUR PLASTIC या प्लास्टिक कचरा विषयी सुरू असलेल्या पर्यावरण पूरक अभियानाची एक चित्रफित देखील या वेळेस सौ.देशमुख यांच्या उपस्थितीत प्रथमच प्रदर्शित करण्यात आली. त्यांनी या अभियानच कौतुक करत नागरिकांना प्लास्टिक कचऱ्यापासून होणाऱ्या दुष्परिणामां बद्दल माहिती देतांना प्लास्टिकचा उपयोग कमी करण्याबद्दल आव्हान केलं.
या कार्यक्रमात वित्तेश्वर संचालक मंडळाच्या डाॅ. गौरी मानकर, सौ. सोनाली उमाटे, सौ. भावना बागडे, सौ. निशा नारेकर, डाॅ. मोनाली पोटोडे, सौ. अनुराधा नवधिंगे, सौ. प्रियंका मुलमुले, सौ. अनुष्का गहरवार, डाॅ. वैशाली दाते, सौ. उज्ज्वला चित्तेवान, सौ. तेजस्विनी लाड सह अनेक महीला उपस्थितीत होत्या.

