संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा तालुक्यातील देवाडा – डोंगरगाव पंचायत समिती सर्कल च्या काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात संवाद साधला. स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जानून घेतल्या, तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सुचना केल्या. यावेळी माजी आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत नितेश सिडाम, सचिन मडावी, राजू दुर्गे, शंकर कुंभरे आदी कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नानाजी आदे, माजी प. स सदस्य अब्दुल जमीर, रमजानभाई, भेंडवीचे सरपंच श्यामराव कोटणाके,
सोनापूर चे सरपंच जंगु पा. येडमे, भाऊजी वडस्कर, शंकर परचाके, दिलीप राऊत, दिलीप दोहे, रवी बावणे यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

