संतोष मेश्राम राजुरा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचांदूर:- शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर, द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी विद्यामंदिर व महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडेमी, गडचांदूर द्वारा दिनांक 24, 25 व 26 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन- 2025 ‘वसंतोत्सव’ चे थाटात उद्घाटन पार पडले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, उद्घाटक शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, प्रमुख अतिथी अल्ट्राटेक सिमेंटचे मुकेश गहलोत, विशेष अतिथी गोंडवाना विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता, राजीव गाधी अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर चे प्राचार्य, संस्थेचे संचालक, डॉ. अनिल चिताडे, प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, विकास भोजेकर, सचिव धनंजय गोरे, सहसचिव मा. उज्वलाताई धोटे, संचालक राहुल बोळे, रामचंद्र सोनपितरे, पुष्पाताई हिरादेवे, शैलेंद्र देव, साईनाथ मेश्राम, किरण कुंडू, राजू वानखेडे, प्रफुल माहुरे, लताताई घाटे यासह अनेक मान्यवर तसेच संस्थे अंतर्गत शाळा, महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.