नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे सायकल रॅलीचे आयोजन. १९६२ ची छोटुलाल सोमलकर यांची ६३ वर्षाची सायकल, राष्ट्रीय पर्यावरण संमेलनातील राजुरा टीम चे प्रथम क्रमांकाचे चषक ठरले लक्षवेधी. पर्यावरण व राष्ट्रिय मतदार दिनानिमित्त सायकल जनजागृती रॅली संपन्न.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 25:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने पर्यावरण जनजागृती व राष्ट्रिय मतदार दिनानिमित्त राजुरा शहरातील मुख्य मार्गांनी सायकल रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड हे होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अरूण धोटे, माजी नगराध्यक्ष, डॉ. अशोक जाधव, वैद्यकीय अधीक्षक, उप जिल्हा रूग्णालय, मनोज गौरकर, गट शिक्षणाधिकारी पं. स. राजुरा, डॉ. संभाजी वरकड, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, प्रशांत पाटील, प्राचार्य महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय, रोटरी क्लब ऑफ राजुराचे अध्यक्ष सारंग गिरसावळे, माजी अध्यक्ष कमल बजाज, आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रशिक्षक ओमप्रकाश गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उमाकांत धोटे, राष्ट्रिय बालहक्क संरक्षण आयोग जिल्हा कृतिदल सदस्य शशिकांत मोकाशी, तालुका क्रीडा संयोजक हरिश्चंद्र विरुटकर, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आशादेवी शाळेचे मुख्याध्यापक दिपक सातपुते, ज्योतीबा शाळेच्या पर्यवेक्षिका धोटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बादल बेले, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष यांनी मानले. यावेळी सायकलिंग क्रिडा स्पर्धेतील राज्यस्तरावरील सहभागाबद्दल स्टेला मॉरीस स्टेट विभागाच्या विद्यार्थिनी अनुष्का भास्कर फरकाडे , मानसी भास्कर वांढरे व विभाग स्थरावरील तृतीय क्रमांक प्राप्त राघवी राजकुमार झा यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे सन्मानचिन्ह, शोल, वृक्षकुंडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोहनदास मेश्राम यांनी पंधराव्या राष्ट्रिय मतदार दिनानिमित्त मतदान प्रतिज्ञा घेतली. नगर पालिकेचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर छोटुलाल सोमलकर यांनी १९६२ ची आजोबांची जुनी ६३ वर्षांची सायकलीवर तिरंगा ध्वज लावुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शहरातील विवीध शाळांच्या राष्ट्रिय हरीत सेना, इको क्लब, स्काऊट, गाईड्स व इतरही विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीत सहभाग घेतला.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा शाखेला राष्ट्रिय पर्यावरण संमेलनातील मुल येथे मिळालेले प्रथम क्रमांकाचे चषक सुद्धा रॅलीतील आकर्षण ठरले. यावेळी सर्व मान्यवरांनी सायकल चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणजेच मतदान करण्याचे आवाहनही केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेफडो संस्था, पोलिस विभाग, उप जिल्हा रुग्णालय, महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय, आदर्श शाळा, इंफंन्ट जीजस इंग्लिश स्कूल, स्टेला मॉरिस स्कुल, आशादेवी मराठी प्राथमिक शाळा आदींनी सहकार्य व परिश्रम घेतले.
यांनी चालवील्या स्वतः सायकली
आमदार देवराव भोंगळे, नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, मनोज गौरकर, गट शिक्षणाधिकारी पं.स. राजुरा, बादल बेले, राज्याध्यक्ष, नेफडो, महीला, पुरुष, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने चालवील्या सायकली. पर्यावरण संवर्धन व राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती केली.