सावनेर- कळमेश्वरचे नवनिर्वाचित आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 23 जाने:- थोर साहित्यिक, नाटककार, लेखक, कै.राम गणेश गडकरी यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करुण त्यांना आदरांजली वाहण्यात आली
श्री. गणेश वाचनालय, गडकरी युवा मंच, राम गणेश गडकरी कला वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे अधिकारी इत्यादी तसेच गडकरी प्रेमींच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांनी निवासस्थान, गणेश वाचनालय, समाधी स्थळ व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
थोर नाटककार व भाषाप्रभू शेक्सपियर नावाने ओळखले जाणारे कै.राम गणेश गडकरी यांचा वारसा जपणाऱ्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली वाहिली.
स्व.राम गणेश गडकरी यांच्या १०६ व्या पुण्यतिथी निमित्त नागपूरच्या पुरातत्व विभागाने गडकरी निवासस्थानाला सुंदर पुष्पहार व विद्युत रोषणाईने सजवले होते, तर समाधी स्थळ व पुतळा सावनेर नगरपालिकेच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती. स्व.राम गणेश गडकरी पुण्यतिथीनिमित्त सावनेर येथील गणेश वाचनालय सभागृहात प्रथम डॉ.चंद्रशेखर बरेठिया, माजी नगराध्यक्ष तथा अरविंद लोधी, डॉ. विजय धोटे, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विनोद जैन यांच्या उपस्थितीत, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर धुंडेले, सचिव प्रथमेश देशपांडे, मुकेश झारबडे, राम गणेश गडकरी महाविद्यालय कला व वाणिज्यचे अध्यक्ष युवराज टेकाडे, सचिव प्रा.विजय टेकाडे व शिक्षक वर्ग,आकार रंगभूमीचे आकाश पौनीकर व दैनिक निर्भीडचे संपादक पांडुरंग भोंगाडे, पत्रकार अनिल अडकिने, पियुष झिंजुवाडिया व इतर गडकरीप्रेमी आले. स्वर्गीय राम गणेश गडकरी यांच्या आठवणीस उजाळा दिला.
स्व.राम गणेश गडकरी यांच्या १०६ व्या पुण्यतिथी निमित्त श्रीकांत पांडे, माजी नगराध्यक्ष अरविंद लोधी, सुधाकर दहीकर, रघुनंदन जामदार, राजपुते सर, रामराव मोवाडे माजी नगरसेवक तुषार उमाटे, प्रमोद ढोले, मंदार मंगळे, आशिष मानकर, महेश चकोले, विनोद बुधोलीया, राम गणेश गडकरी महाविद्यालयाच्या प्राचार्या शोभा ताजणे, प्रा, बोरीकर, प्रा. बावने, घुगल, प्रा.निखाडे, प्रा. गायकवाड, प्रा. ठाकरे, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व गडकरी प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.