संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित जीजस इंग्लिश हाईस्कूल राजुरा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते सकाळी ठिक ७. ४५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी परेड मार्च केले. संस्थेत अंतर्गत शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच शालेय स्तरावरील विविध क्रीडा व अन्य स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, संचालक शंतनु धोटे, कल्याण काॅलेज आँफ नर्सिंगचे प्राचार्य संतोष शिंदे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य समिर पठाण, इन्फंट काँन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह संस्थे अंतर्गत शाळा, महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन खाडे सर यांनी केले.