उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार, सांगली येथे 76 वा प्रजासत्ताक दिनानिमीत्त गोरखनाथ (नाना) भोनाजी गडवीर (माजी संचालक, श्रावस्ती विहार सांगली) आणि यांच्या पत्नी यांच्या हस्ते रविवार, सकाळी 9:00 वाजता भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला.
त्यानंतर श्रावस्ती विहारा मध्ये आपले आदर्श महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, सिम्बॉल ऑफ नॉलेज, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते धूप, दीप, आणि पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करून प्रास्ताविक विहाराचे सदस्य दीपक कांबळे यांनी करून प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विहाराचे सदस्य प्रा. ॲड. संजीव गणपत साबळे यांनी संविधाना बाबत सविस्तर माहिती देऊन संविधानाच्या उद्देशिके मध्ये बंधुता, समता, स्वातंत्र्य हे तीन अत्यंत महत्त्वाचे शब्द अंतर्भूत आहेत याबाबत सविस्तर माहिती आणि त्यांचे महत्त्व सांगून प्रत्येकाने एकोपा आणि बंधुता राहण्याची काळाची गरज बनली आहे. वैयक्तिक जरी मतभेद असले तरी तेथेच विसरून एकता आणि समता बंधुता भावनेने राहणेबाबत अहवान केले. पारमीत धम्मकीर्ती यांनी विश्व मैत्री गीत गायले, राष्ट्रीय गीत प्राध्यापक नरवाडे सर तसेच संजीव साबळे सर आणि कांबळे/उबाळे यांनी सुरेल आवाजात गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमास ज्येष्ठ सदस्य बोधिसत्व भोरखडे मामा, विजय लांडगे, राहुल कांबळे, शोभा कांबळे, भारत कदम, पवन वाघमारे, चंद्रकांत चौधरी चंद्रकांत नागवंशी सह अनेक उपासक, उपासीका उपस्थित होत्या.