अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- कौमी एकता कमिटीच्या वतीने वाघोडा माईन येथे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांचा १६४ वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमामध्ये कौमि एकता कमिटीच्या वतीने विविध धर्माचे प्रचारक धर्मगुरू उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून माजी आमदार सुनीलबाबू केदार यांच्या हाताने बाबाच्या प्रतिमेचे पूजन करून जन्मदिवसाच्या केक कापण्यात आला.मज्जिदचे प्रमुख इमाम गुलाम हुसेन साहेब, दुर्गा माता मंदिर चे पुजारी श्री. राजेश पांडेजी, बौद्ध भिकू शीलरत्न महाथेरो सावनेर, चर्चचे फादर इमानूवेल नाग सावनेर (गुजरखेडी) उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कौमी एकता कमिटी चे अध्यक्ष मकसूद बेग, उपाध्यक्ष जलील भाई, हमीद भाई, इस्लाम भाई, सचिव लाला सलमानी मुसाहिद गोलू शाहू, हाफिज भाई, कादर सय्यद, मन्सूर बेग, मोशीन खान, कादर सय्यद, शुभम साई, मुसाहीद लाला सलमानी ,मन्सूर भाई, आसिफ शेख, जमील अहमद, अब्दुल अहमद इत्यादी उपस्थित होते

