✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
समुद्रपुर(वर्धा):- जिल्हात येणार्या समुद्रपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू विक्री सुरू असून आता याविरोधात पोलिसांनी कमार कसली आहे. सनांच्या पार्श्वभुमीवर समुद्रपुर तालुक्यात गावखेड्यात शांतता राहावी म्हनुन उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट दिनेश कदम व पोलिस निरीक्षक प्रशांत काळे ठाणेदार समुद्रपुर यांचे आदेशाने आज दिनांक 27/09/22 रोजी पो स्टे समुद्रपुर परिसरातील पोलिस पथकातील अरविंद येनुरकर व याच्या टिम ने मौजा गणेशपुर पारधी बेड़ा येथे वॉश आउट मोहीम राबऊन जमिनीत गाडुन असलेले 89 प्लास्टिक व लोखंडी ड्रम मधील अंदाजे 5900 लीटर मोहा सड़वा रसायन प्रति लीटर 50 रु प्रमाने 2,95,000 रु व ड्रम किं 17,800 रु असा एकुन 3,12,800 रु चा मोठ्या प्रमाणात मोहा सड़वा रसायन नाश करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलिस प्रकटीकरण पथकातील पोलिस हवालदार अरविंद येनुरकर, कृष्णा इंगले, नायक पोलिस शिपाई रवि पुरोहित, वैभव चरडे, कारवाई करत 3,12,800 रु चा मोठ्या प्रमाणात मोहा सड़वा रसायन नष्ट केला आहे.

