मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने निवेदन. परतूर तालुक्यातील सातोना सर्कल इंजिनियर अंकुश लहाने यांच्या कॉलची सीडीआर मार्फत चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- पंचायत समिती अंतर्गत चालू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना व माता रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थी यांना शासनाने ठरवून दिलेला निधी 1 लाख 20 हजार इतकी आहे आणि जे पंचायत समितीचे घरकुल विभागाचे इंजिनियर परतूर तालुक्यातील प्रत्येक गावातील लाभार्थी यांच्या कडून घरकुलचे बील टाकण्यासाठी एका घरकुल लाभार्थ्याकडून एका बिलाचे 4000 हजार रुपये तर असे एकूण तीन बिलाचे 12000 हजार रुपये घेतात त्यामुळे लाभार्थी यांनी घर बांधावे की, फक्त इंजिनियर व कर्मचारी यांचे घर भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण घर बांधण्यासाठी मिस्त्री चे 70 ते 80 हजार रुपये मजुरी होते 40 हजारामध्ये लाभार्थिंनी विटा वाळू सिमेंट कसे आणावे आणि त्यातली त्यात इंजिनियर घेतात 10 ते 15 दहा हजार रुपये तर लाभार्थी यांना असा प्रश्न परतूर तालुक्यात निर्माण होत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी परतूर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी समाधान कारक उत्तर न देता सांगितले की, इंजिनियर हे माझ ऐकत नाहीत इंजिनियर मनमानी कारभार करतात तर तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांच्याकडे तक्रार करा असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करण्यात आली, सातोना सर्कल व परतूर तालुक्यातील सर्व इंजिनियर हे लाभार्थीकडून अंकुश लहाने यांनी प्रत्यक लाभार्थी यांच्याकडून एजेंट हाताशी धरून 45000 हजार रुपये चे बील टाकण्यासाठी 4000 हजार रुपये प्रती लाभार्थी कॅश घेतात व बील टाकतात असा प्रकारे लाभार्थी यांना लुटणाऱ्या भ्रष्ट इंजिनियर अंकुश लहाने यांच्या फोन सीडीआर काढून चौकशी करून निलंबित करण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने आपल्या कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडी परतुर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे यांनी दिला.

