चष्मे नंबर तपासणी तथा मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न.
सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर,दि.२८:- रोजी शहीद भगत सिंग यांच्या जयंतनिमित्त मुस्तकबिल अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवा मंच तर्फे एकदिवसीय निःशुल्क नेत्र तपासणी तथा चष्मे नंबर तपासणी तथा मोतीबिंदू ऑपरेशन आणि बी.पी शुगर चाचणी शिबिरचे आयोजन डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळे दादमहाल वार्ड येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरचा हजारोच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिर मध्ये एकूण २५ ते ३० नागरिकांचे मोतीबिंदू ऑपरेशन संस्थे तर्फे मोफत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगत सिंग आणि भारताचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा छायाचित्रावर माल्यार्पण करून करण्यात आली.
शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत व सहकार्याने हा कार्यक्रम सफलता पूर्वक पार पाडण्यात आला. मुस्तकबील अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवा मंच तर्फे मागील अनेक वर्षांपासून असे जनतेचे हिताचे कार्यक्रम राबवित आले आहेत. जनतेची सेवा करणे हीच या संस्थेचा मुख्ये उद्देश आहे. आणि पुढे या संस्थे तर्फे ६०० बेडचा विशाल रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात मोफत किंवा शासकीय दारावर नागरिकांचे उपचार करण्यात येणार. या रुग्णालयाला निर्माण करण्याकरिता चंद्रपूर जील्हाचे सर्व मान्यवरांनी सहभागी व्हावे व एक इतिहास निर्माण करावं असे आव्हान संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष अय्युब भाई कच्छी यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन शोएब कच्छी यांनी केले. कार्यक्रमाला अर्शद कच्छी, अरबाज कच्छी, अरबाज शेख, अदनान पठाण, वकार कुरेशी, शाहरुख कुरेशी, बाबू कुरेशी, शाहरुख शेख, नावेद शेख, व दादमहेल वार्ड युवा अघाड़ी यांचा सहभाग लाभला व यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

