✒️सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- थोर भारतीय क्रांतिकारक शहीद- ए -आझम भगतसिंग यांच्या जयंती निमित्त टेकडीची राणी जगदजननी दुर्गा मंडळ, महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व वातावरण भक्तिमय आणि देशप्रेमाने ढवळून निघाले. यावेळी उपस्थित सर्वांना शहीद वीर भगत सिंग यांच्या कार्यकर्तृत्व आणि विचार सांगून प्रबोधन करण्यात आले. सोबतच दररोज एका महापुरुष बद्दल माहिती देण्याचा संकल्पही घेण्यात आला. सदर कार्यक्रम टेकडीची राणी जगदजननी दुर्गा मंडळ, महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर यांनी केले.
यावेळी शहीद ए आझम भगतसिंग यांच्या प्रतिमेला मंडळाचे अध्यक्ष तानाजी वैद्य, मनोज वणकर, विनोद मानेकर, प्रदीप पवार, राकेश कन्नाके, राकेश बुरडकर, रवि मानेकर, भास्कर वडस्कर यांनी माल्यापर्ण केले. चेतन पावडे, यांनी भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित देश भक्तीचे विचार प्रकट केले. तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन किशोर मोहुर्ले यांनी केले. उपस्थीत बाल गोपालानी इंकलाब जिंदाबाद, भगतसिंग जिंदाबादचे नारे दिले. सदर कार्यक्रमात मंडळाचे संजय काळे, मनोज सेंगर, रविंद्र मडावी, विकास सेडमाके, नरेंद्र दुर्वे, मनोज सेंगर, हर्ष बहूरिया, शैलेंद्र सेंगर, मल्लेश गड्डीलवार, शरद भानारकर यादी पदाधिकारी समस्त सदस्य गन, महिला मंडळ, वॉर्डातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

