राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो नं 9518368177
गोंडपिपरी :- नवनिर्मित सुरजागड लोहप्रकल्पासाठी जडवाहतूक सोईची होईल,परिसरातील जनतेची नुकसान होणार नाही,यासाठी म्हणून बल्लारपूर -गोंडपिपरीमार्गे – सुरजागड अशी रेल्वेलाईन टाकण्यात यावी,यासाठी गोंडपिपरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेत निवेदन दिले.असे झाल्यास या परिसरातील जडवाहतूकीच्या समस्या सुटू शकतील,यासाठी आपल्या स्तरावरुन पाठपूरावा करावा यासाठी आग्रह धरला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहप्रकल्प सुरु झाला आहे. या प्रकल्पातील खनीज संपत्तीची वाहतूक आलापल्ली, गोंडपिपरी व्हाया बल्लारपूर पर्यत दिवसरात्र सुरु आहे. बल्लारपूरपासून हे लोहखनीज आवश्यक त्या – त्या ठिकाणी रेल्वे लाईनमार्गे स्थलांतरीत केल्या जात आहे. असे असतांना मात्र सुरजागडपासून खनिज संपत्तीची वाहतूक सुरु असतांना आलापल्ली,गोंडपिपरी ते बल्लारपूर या मार्गावर या जड वाहतूकीमूळे मोठमोठे खडे पडले आहेत. या मार्गात अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किरकोळ अपघात दररोजचेस झाले आहेत. या मार्गात रोडलगत असलेल्या गावखेड्यातील नागरिक जिव मूठीत धरुन जगत आहे.
काही दिवसांपूर्वी गोंडपिपरी शहरात रोडलगत असलेल्या घरात भरधाव ट्रक घूसली. या दूर्घटनेत चालकाचा जागिच मृत्यू झाला.तर “त्या” कुटूंबियाची मोठी नुकसान झाली. यावर संताप व्यक्त करत गोंडपिपरीकरांनी आंदोलन उभारत सुरजागड प्रकल्पाच्या जड आणि भरधाव वाहतूकीवर नाराजी व्यक्त केली.ही घटना ताजी असतांना मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम या गावात सुरजागड प्रकल्पाच्या हायवा ट्रक आणि दूचाकीत मोठा अपघात झाला. यात पत्नीचा जागिच मृत्यू तर पती गंभिर जखमी झाला. यानंतर परपरिसरातील नागरिकांनी रोश व्यक्त करत तब्बल १० हायवा ट्रक जाळल्या.एकूणच या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.रोड अत्यंत खराब झाले आहेत. गाड्यांच्या जड आणि भरधाव वेगामूळे आरोग्याच्या देखिल समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामूळे नवनिर्मित सुरजागड लोह प्रकल्पासाठी वाहतूक सोईची होईल आणि परिसरातील जनतेची नुकसान होणार नाही,यासाठी म्हणून बल्लारपूर -गोंडपिपरी – सुरजागड अशी रेल्वेलाईन टाकण्यात यावी.
गोंडपिपरीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री हंसराज अहिर यांची भेट घेत निवेदन दिले. आपल्या स्तरावरुन पाठपूरावा करण्याची विनंती केली. यावेळी भाजपचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार,तालुका संयोजक गणपती चौधरी(गुरुजी), प्रतिष्ठित व्यापारी सुहास माडूरवार, दिपक बोनगिरवार, साईनाथ मास्टे, गणेश डहाळे आदीची उपस्थिती होती.

