पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधी
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
दि.२५/०९/२०२२ रोजी रात्री ०१/०० वा. चे सुमारास फिर्यादी राम सुदाम मोहाळे रा. खोकले, गंगाखेड जि. परभणी हे श्रीराम रोडवेज ट्रान्सपोर्टचा ट्रक क्रमांक एम.एच.४६. बी. बी. ६२४६ हा मंतरवाडी रोडवरील सीएनजी पेट्रोल पंपाचे पुढे आल्यावर त्यांचे पाठीमागून नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच अॅक्टिव्हा गाडीवरून आलेल्या इसमांनी ट्रकला अॅक्टीव्हा गाडी आडवी घालून ट्रक थांबविली आणि फिर्यादी ड्रायव्हर यांना मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट असा एकूण १५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्ती हिसकावन घेतला. सदर परीसरात फुरसंगी मार्शल प्रशांत भोसले आणि हेमत कुमार हे मतरवाडी रोडवर पेट्रोलींग करीत असताना त्यांना नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाची अॅक्टिव्हावर ट्रिपल स्टिजाताना काही संशयीत दिसून आले. भोसले व कुमार यांनी अॅक्टीव्हचा पाठलाग करून गाडीवरील तिघाना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु संशयीत तिघेजण अॅक्टीव्हा सोडून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. पोलीसाचे ताब्यातील अॅक्टीव्हाचा तपास करता तपास पथकातील अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांनी आरोपी १) ओमकार ऊर्फ खंडवा राजु शिंदे वय २२ वर्ष रा. वाडी हडपसर पुणे २) ओमकार ऊर्फ खंड्या राजु शिंदे वय १६ वर्ष ( विधसंघर्षित चालक) ३) आयान वसिम सय्यद वय १७ रा. सदर ( विधीसंघर्षित बालक ) यांना ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेली काळ्या रंगाची अॅक्टीवा व चोरलेला मोबाईल व रोख रक्कम असा कि.रु १,२०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १२९७ / २०२२ भा.द.वि. कलम ३९४ ३४१, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे हे करीत असून आरोपीकडून आणखी जबरी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
२) दि. २५/०९/२०२२ रोजी २०/४५ वा सुमारास सागर गायकवाड हा डोक्यामध्ये गंभीर जखमा आणि रक्तस्त्राव होऊन बेशुध्द अवस्थेत नारळ बाग, केशव चौकाजवळ, माळवाडी, हडपसर, पुणे येथे पडल्याचे माहीती प्राप्त झाल्याने तपास पथकातील अधिकारी विजयकुमार शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस उप निरीक्षक, तसेच अंमलदार समिर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अंमलदार शाहीद शेख ,अतुल पंधरकर, प्रशांत टोणपे भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंचरकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला. पोलीस अंमलदार प्रशांत टोणगे यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी कृष्णा विठ्ठल रेखले वय २७ वर्ष रा. कवडी गाव टोल नाका, लोणीकाळभोर पुणे यास गुन्हा झालेपासून २ तासाचे आत ताब्यात घेतले. केलेल्या तपासात आरोपी कृष्णा रेखले याने भंगार विक्रीतील पैसे वाटपाच्या वादावरून भांडणात सागर गायकवाड यास बाबुने आणि दगडाने गुन्हयाची कबुली दिली नठानिष्पन्न झाले आहे. मयत व आरोपी दोघेही रिक्षा चालक आहेत. आरोपीने रक्ताने माखलेला मोडका बाबू ताब्यात दिले आहे. हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १२१९ / २०२२ भा.दं.वि. कलम ३०२, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(२) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस चंतन थोरबोले सहाय्यक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत फिर्यादी संजय रामदास उमाळे वय ४२ वर्ष रा. औदुंबर कॉलनी काळेपडळ, हडपसर पुणे हे दिनांक २७/०८/२०२ रोजी
पहाटे ०३.३० वा. चे सुमारास निर्मल टाऊनशिप सोसायटी समोरील कॉर्नर, काळेपडळ येथून पायी जात असताना हा शाईन
गाडीवरून आलेल्या तीन इसमांनी त्यांना धमकावून त्यांचेकडील रोख रूगावे व मोबाइल है जबरदस्तीने चोरून नेल्याने हडपसर
पोलीस स्टेशन गु.र.नं १९३६ / २०२२ भा.दं.वि. कलम ३९२, ५०४, ५०६, ३४ गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील पाहीजे आरोपी ऋषीकेश भारत पाचाळ वय २० वर्ष रा. जेएसपीएम कॉलेज पाठीमागे, आदर्शनगर ऊरुळी देवाची पुणे हा फरारी झाला होता. तपास पथकातील पोलीस अंमलदार निखील पवार आणि प्रशांत दुधाळ यांना मिळालेल्या बातमीवरून सराईत गुन्हेगार ऋषीकेश पांचाळ याचा शोध घेवून त्यास दिनांक २८/०९/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे. ऋषीकेश पांचाळ हा रेकोर्डवरिल आरोपी असून त्याचे बिरूद हडपसर पोलीस स्टेशन येथे मागील दोन वर्षांत हत्यार कायदा, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी असे ०५ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयात त्याचा साथीदार आकाश दिपक साटम वय २१ वर्षे रा. लेन. ४ काळेपडळ, हडपसर, पुणे यास अटक करून गुन्हयातील शाईन दुचाकी व फिर्यादीचा मोबाईल जप्त करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनिरी अविनाश शिंदे करीत आहेत.
४) दिनांक १५/०५/२०२२ रोजी १९/०० वा. चे सुमारास हॉटेल भिंगारा, मौर मॉल शेजारी काळेपडळ, हडपसर, पुणे या ठिकाणी फिर्यादी अमिर इब्राहीम तांबोळी, वय २४ वर्ष, रा. ए. के. बिल्डींग, अल्फा पेट्रोल पंपासमोर कुंजीरवाडी पुणे हे काम करीत असताना दोन दुचाकी मोपेड गाडीवरून आलेल्या इसमांनी फिर्यादी यांच्या गळयाला कोयता लावून तसेच डाव्या खाच्यावर कोयत्याने वार करून लाथा बुक्यांनी मारहाण करून हॉटेलच्या गल्ल्यातील राख २४,००० रुपये बळजबरी चोरुन गेले असलेबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १९७४ / २०२२ भा.द.वि कलम ३९४, ५०६,३४ सह आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मु.पो. का कलम ३७ (१) (३) सह ९३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही मधून मिळालेल्या शेटक माहिती आधारे अनोळखी आरोपी निष्पन्न करून हडपसर पोलीस ठाणेकडील तपास
पथकाने कौशल्याने गुन्ह्यातील एकुण ७ आरोपी निष्पन्न केल्याने सदर दरोड्याच्या गुन्हयात ०३ आरोपी नामे १) शुभम रमेश मोरे
वय २२ वर्ष रा. शिवनेरी कोलनी नंबर ०२ पापडे वरती भेकराई नगर हडपसर पुणे २) प्रसाद हनुमत कावळे वय २१ वर्ष रा. घरौंदा सोसायटी, घर नंबर २७५, फुलेनगर विश्रांतवाडी पुणे ३) हेमत संदीप चौगुले वय २० वर्ष रा. चौगुले मळा, मातृछाया बिल्डींग, शिवरकर उद्यानाजवळ वानवडी पुणे यांना अटक करुन त्याची दि. ०३/१०/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. नमुद आरोपी यानी त्यांचे फरारी साथीदार कौतुक क्षिरसागर, अंबर शेख, रोहन धोत्रे, धनेश शिंदे यांचेसह गुन्हा केला असल्याचे तपासामध्ये कबुल केले आहे.
आरोपी हे कॉलेज मध्ये शिक्षण घेणारे असून त्यांनी मोजमजेसाठी पैशांची आवश्यकता असल्याने दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिल्ली आहे. सदर तपास अविनाश शिंदे पोलीस उप निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत. असे हडपसर पोलीसांनी मागील ४८ तासात ०९ खुन ०१ दरोडा व ०२ जबरी पो या असे ०४ गंभीर गुन्हे उघडकीस आणुन ०८ आरोपी अटक करून गुन्हयातील वाहने, हत्यारे मोबाइल व रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.
सदर गुन्हयाचे तपास उघडकीस आणणेसाठी मा. श्री नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशि पूर्ण शहर, मा. नम्रता पाटील मॅडम, पोलीस उप आयुक्त परी ५. पुणे शहर आणि मा. बजरंग देसाई, सहा हडपसर विभाग, पुणे शहर यांनी मार्गदर्शन केले. वरीष्ठांचे मार्गदर्शनानुसार अरविंद गोकुळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे सपोनि श्री विजयकुमार
अविनाश शिंदे ,अंमलदार समिर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अंमलदार शाहीद शेख ,अतुल पंधरकर, प्रशांत टोणपे ,भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंचरकर यांनी कामगिरी केली आहे.