अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ६ मार्च:- श्री क्षेत्र वाकी येथे ३ मार्च पासून बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८२ वा वार्षिक उर्स ला सुरुवात झाली. ऊर्स दि.३ ते ९ मार्च २०२५ दरम्यान वाकी येथे साजरा करण्यात येत आहे.
६ मार्च ला नागपूरचे श्रीमंत राजे रघुजी भोसले, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्रीमंत राजे जयसिंग भोसले तसेच वाकी चे सज्जादा नशीन व संपूर्ण डहाके परिवार व ताजबागचे खादीम आणि भक्त परिवार यांच्या उपस्थितीत कुलचा कार्यक्रम संपन्न झाला. या उर्स कार्यक्रमा दरम्यान दररोज मिलाद कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम होईल.
दि ७ मार्च ला सकाळी १० वा. ह.भ.प.हरिशचंद्र वंजारी महाराज लाडगाव काटोल यांचे कीर्तन होईल. रात्री ८ वा. स्वर धारा म्यूजिकल ग्रुप मनीष परिहार, अशोक अंजाम, तारा भाई जबलपुर यांच्या वतीने सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि.८ मार्च ला सकाळी १० ते १२ वा. पर्यंत ह.भ.प. कन्हेरकर महाराज मु.चिखलसावंगी जि.अमरावती यांचे किर्तन होईल. रात्री ८ वा. स्वरांजली ग्रुप, ठोसर बंधू द्वारा प्रस्तुत भजन संध्या होईल.
दि ९ मार्च ला सकाळी १० ते १२ वा. पर्यंत ह.भ.प. गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले.श्री.संत मानकोजी वंशज श्री.क्षेत्र पंढरपूर.यांचे गोपाल काल्याचे किर्तन होइल. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, आमदार मोहन मते, डॉ.राजीव पोतदार, अशोक धोटे, मनोहर कुंभारे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहुन या उत्सवाचा समारोप होईल.
या उर्सनिमित्त परिवहन महामंडळ तर्फे बसेसची व्यवस्था करण्यात येईल.तसेच या उर्स मध्ये विविध प्रकारचे दुकाने, मनोरंजन पार्क, खेळण्याचे दुकाने लावण्यात आलेले आहे. तसेच रोज ट्रस्ट कडून महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. उत्सवादरम्यान भाविकांनी नियमाचे पालन करूनच दर्शन घ्यावे. तसेच भाविकांनी कोठेही गर्दी करु नये भाविकांनी बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जदा नशीन श्री.प्रभाकर डहाके पाटील यांनी दिली.

