कर्जमाफी, सोलर फेंसिंग अशा अनेक योजना लागू न केल्याने शेतकरी नाराज.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकली नसल्याबाबत तसेच शेतकऱ्यांच्या शेताला “सोलर फेन्सिंगची” योजना लागू न करू शकल्याबाबत, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे पत्र माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी मार्फत शेतकऱ्यांची व्यथा मांडत पत्र देण्यात आले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करू शकली नाही? ही शोकांतिका आहे तसेच केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्याला एक रुपयात पिक विमा काढण्याची सोय सरकारने केली असून उर्वरित रक्कम ही शासन जमा करणार होती. मात्र शासनाने आपला वाटा न भरल्याने भरपाई अडली असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशांची वाट पहावी लागत आहे.
जंगली जनावरांच्या वाढलेल्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. जंगली जनावरांच्या विधवांसामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात जाऊन अंधारात जागल करावी लागते. शेतीचे संरक्षणासाठी सरकारने सोलर फेन्सिंगची योजना लागू न केल्यामुळे शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे. म्हणून हा अर्थसंकल्प शेतकरी हिताचा नाही असे पत्र माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे.

