मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवारांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस श. प नेते अतुल वांदीले यांनी पत्रकाराना दिलेल्या मुलाखतीत अत्यंत बोगस अर्थसंकल्प असे म्हणत टोला लगावला.
यंदाचा हा अर्थ संकल्प हा पूर्णपणे अर्थ शून्य असून लाडक्या बहिणींना 2100 रुपये व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थ संकल्प असल्याची सडकून टीका अतुल वांदिले यांनी केली आहे.

