पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागाची लाचार, अस्वस्थ अवस्था घेऊन शिवसेना (ठाकरे) पक्ष नागपूर शहर तर्फे अग्निशमन दलाच्या रिक्त फायरमॅन जागांच्या भरतीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात मनपा अंतर्गत अग्निशमन विभागात २.५ वर्षापासून पासून प्रलंबित असलेल्या फायरमॅन भरतीप्रक्रियामुळे अनेक तरुण- तरुणीचे बेरोजगारीचे प्रश्न घेऊन शिवसेनेने प्रशासक मनपा अभिजीत चौधरी यांचा घेराव करून तीव्र आंदोलन केले.
यावेळी तिवारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री याना उद्देशून सांगितले कि, गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड येथे अग्निशमन दलाच्या एका कार्यक्रमात अग्निशमन विभागाला प्राधान्य देत कॅलिफोर्नियाच्या आगजनीच्या घटनेला उद्देशून अमेरिकेच्या सरकारने योग्य अग्निसुरक्षा न दिल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सांगितले. परंतु मुख्यमंत्रीच्या स्वतःचा शहरात मात्र ११ फायर स्टेशन विद्यमान आहेत, जेव्हा कि नियमानुसार २ लाख लोकसंख्यावर १ स्टेशन प्रमाणे २० फायर स्टेशन होणे गरजेचे आहे आणि प्रत्येक स्टेशनला प्रति शिफ्ट २० फायरमॅनची आवश्यकता असल्याने तीन शिफ्ट मिळवून एकूण ६० फायरमॅन, तसेच २० स्टेशनला १२०० फायरमॅनची आवश्यता आहे परंतु महानगर पालिकेत फक्त १२७ स्थायी फायरमॅन असल्याने नगरवासियांचे जीव धोक्यात आहे..
उन्हाळ्यात अग्नीतांडवाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. या पार्श्वभूमीवर जर त्वरित भरती न झाल्यास मोठ्या दुर्घटना घडू शकतात, असा इशारा तिवारी यांनी दिला. “मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या शहरातच जर अग्निशमन दलाचा मोठा तुटवडा असेल, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार?” असा सवाल त्यांनी केला.
२०२३ पासून ३५२ फायरमॅनची भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याने आवेदन करणारी ७००० भूमिपुत्र युवक युवती वय मर्यादा पार झाल्यामुळे बेरोजगारीच्या खतऱ्यामुळे भयभीत आहेत. प्रशासक अभिजीत चौधरी यांना तातडीने अग्निशमन विभागाच्या प्रस्तावित भरती घेण्यास सरकारकडे पाठपुरावा करून भरती घेण्यात यावी ही मागणी केली अन्यथा युवकाच्या रोजगार प्रश्नावर आणि जनतेच्या सुरक्षासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात दीपक कापसे, युवासेना जिल्हा प्रमुख प्रीतम कापसे, युवासेना शहर प्रमुख आशिष हडगे, युवासेना जिल्हा चिटणीस अब्बास भैय्या, युवासेना विभागीय सचिव अपूर्वा पित्तलवार, मुण्णा तिवारी, राम कुकडे, अंगद हिरौंदे, सुनील बॅनर्जी, अल्पेश पाटील, सुरेंद्र आंबीलकर, ललित बावनकर, तौसीफ शेख, शिवशंकर मिश्रा, भूपेंद्र काठाने, कार्तिक करोशिया, अभिषेक धुर्वे, आकाश शिर्के, मुकेश सूर्यवंशी, उमेश वर्मा, इब्राहिम शेख, गौरव मोहोड, नवीन शर्मा, विशेष मचलवार, कमलेश त्रिपाठी, भास्कर कायरकर, इरफान शेख, वृषभ खंदारे, भुवन वैरागडे, करण मशराम, विष्णू पोटफोडे सह असंख्य युवक युवती उपस्थित होत्या.

