मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 11 मार्च 2025 रोजी शिवमंदिर हिंगणघाट येथे शिवसेना प्रणित युवा सेनेचा भव्यपक्ष प्रवेश महेश मुडे जिल्हाप्रमुख युवासेना यांच्या नेतृत्वात संपन्न झाला. संदीप गोटमारे व मित्रपरिवार (मनसे) यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर कार्य करणारी व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार कष्टातून निर्माण झालेल्या शिवसेनेचा आज आपल्या सर्व कार्यकर्त्या सोबत युवा सेनेमध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी पक्षप्रवेशाला अमित गावंडे शिवसेना तालुका प्रमुख, राजू हिंगमिरे ज्येष्ठ शिवसैनिक, सुनीता तांबोळी महिला आघाडी शहर संघटिका, प्रशांत लहामगे शिवसेना शहर प्रमुख उपस्थित असून सतीश तांबोळी यांच्या विशेष सहकार्याने हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून वंदनीय बाळासाहेबांचा ८०% टक्के समाजकार्याचा वसा आणि वारसा भक्कमपणे मराठी माणसात रुजून शिवसेना घराघरापर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी युवासेना पार पाडेल असा विश्वास युवा सेना जिल्हाप्रमुख महेश मुडे यांनी यावेळी व्यक्त करत पक्षप्रवेश केलेला सर्व युवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

