आग विजण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आकारते जबरन रक्कम.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. जळालेल्या घराची आग विजवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अग्निशामक दल सात हजार रुपये आकारण्यात येत असल्याची खळबळ जनक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी गाडी पाठवीत अन्यायकारक पैसे उकळण्याचा नवा ट्रेंड हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सुरू केल्याची चर्चा हिंगणघाट शहरात सुरू आहे.
हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड तेलंग पेट्रोल पंप मागील परिसरातील रहिवासी सुनील घुंगरूळ यांच्या निवासस्थानी दिनांक १ मार्च २०२५ रोजी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यांनी तात्काळ अग्निशामक कार्यालयात दूरध्वनी द्वारे संपर्क करून अग्निशामक दल गाडी बोलवली व त्वरीत आगीवर वर नियंत्रण आणले. या आगीमुळे घरातील एसी, रेफ्रिजरेटर, कपाट व इतर साहित्य आगीने जळून खाक झाले. त्यात त्यांना लाखांचे नुकसान झाले.
घराला लागलेली भिषण आग नियंत्रणात आल्या नंतर सात दिवसानंतर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे अग्निशामक वाहनाचे बिल सात हजार रुपये सुनील घुंगरूड यांना पाठविण्यात आले. गोरगरीब जनतेच्या घराला आग लागली असता तर ती विजवण्यासाठी अग्निशामक दल सात हजार रुपये ४० मिनिटाचे बिल आकारत आहे. त्या जळालेल्या आगीमुळे त्यांचे लाखोचे नुकसान झाले त्याच काय. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समिती ही त्यांना सात हजार रुपयांचे बिल पाठवित आहे. यावर असे आढळते की कृषी उत्पन्न बाजार समिती ही शासनाची आहे की कोणाची व्ययक्तिक आहे ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. या घटनेमुळे जळालेल्याच्या अंगावर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

