मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे बसस्टॉप जवळील टाकाग्राउंड मधे भव्य स्वरूपात दि. १८ एप्रिल ते २३ एप्रिल २०२५ पर्यंत हिंगणघाट महोत्सव व एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लहान्या पासून थोरामोठ्यां पर्यंत विविध प्रकारचे मनोरंजनात्मक, करमणूकीचे व खाद्यसंस्कृतीने युक्त अशा कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून हिंगणघाट व परीसरातील नागरीकांन करिता ही आनंदांची पर्वनीच ठरणार आहे.
त्याकरिता आवश्यक असलेले बसस्टॉप जवळ डॉ.मुन हाॅस्पिटला लागुन, ट्रॅव्हल्स पॉईट जवळील कार्यालयाचे उद्घाटन महोत्सवाचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर, स्वागताध्यक्ष संजय कासवा, वासुदेव पडवे आणी प्रोजेक्टचे डायरेक्टर प्रशांत पांडे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध सारेगम मधिल गायीका, पुणे येथील सुप्रसिद्ध सुफी साॅंग, मुंबई येथील सुप्रसिद्ध राॅक बॅन्ड, काशी येथील फेमस तबला वादक, इंडियन आयडल मधील गायक अशा सहा ही दिवस नामवंत कलाकारांनी युक्त कार्यक्रमाचा लाभ जनतेने घेण्याचे आव्हान कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात आले.
ह्या प्रसंगी कमेटीतील सभासद प्रशांत भेदुरकर, सतिश कावळे, स्वप्निल बाराहाते, सौ. चंदा येलेकर, सौ. भारती कावळे, सौ. सुचिता सातपुते, सौ. सुनिता सेनाड, सौ. अर्चना पिंपळकर, सौ.अर्चना नांदुरकर, कु. वनिता पराते, सौ. स्वाती पिंपळकर इत्यादी प्रामुख्याने हजर होते.

