अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक हिंगणघाट येथील आर. एस. बिडकर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ. शरद विहीरकर यांना बेस्ट अँक्डीमिसीयन ऑफ द इयर या पुरस्काराने थ्री जी फाउंडेशन इंडिया आणि सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकल् अँडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया च्या वतीने डॉ.चंद्रहास हांडा डायरेक्टर व्हीआयटी, डॉ. अजय लाड डायरेक्टर आयआयएल संत गाडगेबाबा विघापीठ अमरावती, डॉ. हरीश मोहिते अध्यक्ष थ्री जी फाउंडेशन प्राचार्य डॉ.के.जी. रेवतकर, सचिव स्टॉमी प्राचार्य देवाशिष भौवमिक नागपूर यांच्या हस्ते सन्माननित करण्यात आले.
प्रा.डॉ.शरद विहीरकर हे अतिशय विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असून त्यांनी आता पर्यत 25 रिसर्च पेपर, तीन चाप्टर इन बुक व दोन पुस्तके व इतरही साहीत्य प्रकाशीत केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला. युजीसी नवी दिल्लीच्या सौजन्याने मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला असून त्यांनी महाविद्यालयातील लाइफलॉग लर्निंग व विस्तार विभागाचे प्रोगॉम ऑफीसर म्हणून कार्य केले. आता ते आय क्यू ए सी समन्वयक म्हणून सुद्धा कार्य करीत आहे. सध्या ते राष्ट्रसंत नागपूर विद्यापीठ नागपूर मध्ये लॅंग्वेजेस इन कॉमर्स बोर्ड चे सदस्य आहे. त्याच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्षा डॉ. उषा किरण थुटे, प्राचार्च डी.व्ही.नाईक, प्राचार्य डॉ. बी.एम.राजुरकर, आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले, प्रा. डॉ. विनोद मुडे, प्रा.डॉ.विजय झाडे, डॉ गिरीधर काचोळे, डॉ. कमलकिशोर इंगोले, डॉ. बलराज अवचट, डॉ अनिल बाभळे, डॉ.गजानन ठक, डॉ. श्रीकृष्ण बोढे, डॉ.अरविंद सोमनाथे, डॉ.कमलाकर नवघरे, प्रा.विनोद पुनवटकर, प्रा. प्रमोद वानखेडे डॉ. मिलींद तेलंग, प्रा. विकास बेले, डॉ.रमेश भगत, प्रा.रविन्द्र महाकाळे, डॉ. जया जॉन, डॉ.जयंत शेंडे, प्रा.डॉ.किशोर भूते, प्रा.डॉ. ज्योत्सना जुमड़े, प्रा. डॉ. श्रुती घरडे, सर्व मित्र परिवार तसेच आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला.

