मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटन मार्केट यार्ड, हिंगणघाट येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्य त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सभापती अँड सुधिर कोठारी, हिंगणघाट बाजार समितीचे संचालक राजूभाऊ मंगेकर, घनश्याम येरलेकर, माजी नगरसेवक प्रकाश राऊत, सचिव टी. सि. चांभारे व संपुर्ण कर्मचारी वृंद उपस्थित होते.

