मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
वर्धा:- फिर्यादी सिद्धार्थ दमडुजी थुल, वय 58 वर्ष, रा. करंजी (गे) हे त्याचे स्थिती भोसले अंदाजे 10:30 वा. दरम्यान मौजा करजी (भोगे) येथील स्थानिक पोलीस पाटील धनराज बलवर यांनी फिर्यादीला फोनद्वारे माहिती दिली की, त्यांचा भाऊ अरुण कुमार थुल याला कोणीतरी अज्ञात इसने त्याचे उघडपणे उत्तर देऊन जिवानिशी ठाकले आहे. अशी माहिती घेऊन फिर्यादी यांनी त्यांचा भाऊ अरुणकुमार थुल दिसत जावुन पाहिला, घराचा किचनचा दरवाजा उघडा व बेडरुमचा लाकड़ी दरवाजा तुटुन खाली पोस्टला दिसला. फिर्यादी यांनी घराचे आत जावुन पाहीले, फिर्यादीचा भाऊ अरुणकुमार थुल हे घरामध्ये खाली रक्ताच्या थारोळ्यात दिसत होते.
कोणीतरी अज्ञात इसमांनी फिर्यादी यांचा भाऊ अरुणकुमार थुल याचे घरात प्रवेश करून व बेडरूमचा लाकडी दरवाजा तोडून कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे त्याच्या डोक्यावर दारुची काचेची शिशी व लाकडी दांडयाने जबर मारहाण करुन जिवानिशी ठार केले. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन सेवाग्राम0येथे कलम अप.क्र. 386/2022 कलम 302, 449 भादंवि अन्वये गुन्हा करण्यात आला.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे घेवून गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपी नामे 1) अजय सुनिल शेंडे, 30 वर्ष, 2) रोशन सुनिल शेंडे, वय 28 वर्ष, रा. भैसारे ले-आउट, कामठवाडा, सेवाग्राम, 3) गौरव गोविंद कापटे, वय 25 वर्ष, रा. नागमंदिर जवळ, वरुड यास सेवाग्राम येथून अटक करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला. सदर कार्यवाही पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर सेल यांनी केली.