अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २५ मार्च:- कळमेश्वर येथे २५ मार्च ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी आमदार श्री.नागोजी गाणार यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा उपाध्यक्ष श्री.मीनानाथ सातपुते यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत श्री.राजेंद्र कुथे सरांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कळमेश्वर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी श्री.आकाश ढगे, कार्यवाहपदी श्री. प्रफुल श्रीराव यांची तर महिला आघाडी प्रमुख म्हणून कु. प्राजक्ता बन्सोड यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्री. मीनानाथ सातपुते, श्री.फारुख शेख, श्री. तुकाराम शेंडे, श्री.अरुण गोतमारे, माजी कार्यवाह श्री. राजेश मारबते, सौं. बेबीताई सहारे प्रामुख्याने उपस्थित. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचलन श्री. राजेश मारबाते सर यांनी केले तर आभार श्री. श्रीराव यांनी मानले.

