मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नगर परिषद च्या मुख्य अभियंता श्री पटेल, प्रशासकीय अधिकारी दबगडे आणि बाबा अली अभियंता यांच्या सोबत मिटिंग मध्ये शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख सतिश धोबे, माजी नगरसेवक मनीष देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
त्यात काही प्रमुख सूचना व मागण्या ठेवण्यात आले.
हिंगणघाट शहरातील शिवाजी पार्क येथे नगर परिषदच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून आतील भागातील मुख्य रस्ता, महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आजू बाजूचे सौंदर्यकरण इत्यादी चे काम सुरू केले आहे. मागच्या काळात सन १९९८-९९ मध्ये शिवाजी पार्क येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आले होते त्या वेळचे पदाधिकारी, अधिकारी यांचे महत्वपूर्ण योगदान होते. त्या वेळी पुतळ्याचे अनावरण प्रसंगी तत्कालीन लोकप्रतिनिधी यांचे नावे असलेली कोणशील त्या ठिकाणी उदघाटन आणि लोकार्पण सोहळा वेळी कोरून लावण्यात आली होती परंतु आता पुतळ्या समोरील सोंदर्यकरण चे काम सुरू असल्यामुळे ती कोणशीला बाजूला काढण्यात आली ती पुनरस्थपित करण्यात यावी.
२) महाराजांच्या पुतळ्याखालील भागात घोड्याच्या टापाखालील असलेली दगडी रचना वेगवेगळ्या रंगाची रंगोटी करण्यात आली आहे ते इतिहासला साजेशी नाही आहे ते सुध्दा दुरुस्ती करावी.
३) महाराजांच्या पुतळ्या समोर एक मोठा भगवा झेंडा होता त्याला सुध्दा विधी पाट न करता झेंडा काढण्यात आला तो पुनश्च त्याच ठिकाणी विधिवत सन्मानाने लावण्यात यावे. ४) या पार्कच्या नावाला दुरुस्ती करून सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान चे नामकरण करावे. ५)छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्या संदर्भात आणि आजू बाजूच्या सोंदर्यकरण बाबत एक शहरातील मान्यवांची कमिटी बनवा. त्या ठिकाणी इतिहास तज्ञ, विविध पक्षाचे प्रमुख मंडळी, न प चे प्रमुख अधिकारी यांची समिती तयार करण्यात यावी .या संदर्भातील माहिती उपविभागीय अधिकारी श्री आकाश अवतारे यांना निवेदनाची प्रत देण्यात आली.
या निवेदन द्वारे या सूचना केल्या आहे ते कोणाच्याही दबावात न येता तत्काळ अमलात आणाव्यात. यात कोनाचाही आक्षेप शिवसेना सहन करणार नाही.चुकीचा निर्णय आपण घेतला तर पुढे होणाऱ्या परिस्थितीला आपण सर्वशी जवाबदार रहाल. म्हणून शिवसेनेच्या वतीने विनंती आहे कि कोणाच्याही दबावात येऊन चुकीच्या पायंडा ला खत पाणी घालून नका अन्यथा शिव सेना रस्त्यावर उतरेल.
निवेदन देतांना उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, शहर संघटक गजानन काटवले, उपशहर प्रमुख अनंता गलांडे,जेष्ठ शिव सेनीक सुनील आष्टीकर, माजी नगरसेवक शंकर मोहमारे, मनोज वरघणे, शितल चौधरी, शंकर झाडे, पप्पू घवघवे, फिरोज खान पठाण, शकील अहमद, दिनेश धोबे, अमोल वादाफळे, प्रशांत कांबळे, राजू मंडलवार, नितीन वैध, बलराज डेकटे प्रामुख्याने उपस्थित होते.

