Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल: पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 10, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल: पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

 पालकमंत्र्यांच्याहस्ते झेंडी दाखवून वायगाव हळदीची खेप दुबईला रवाना  हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेणार

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समुद्रपुर तालुक्यात उत्पादीत होत असलेल्या वायगाव हळदीमध्ये विशेष गुणकारी तत्व आहे. त्यामुळे या हळदीला विशेष मागणी असते. भौगोलिक नामांकन प्राप्त या हळदीला लवकरच देश आणि जागतिक पातळीवर चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल. या हळदीला ‘प्रमोट’ करण्यासाठी अपेडा, ईफिक्की सारख्या संस्थांची मदत घेऊ. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, मार्केटींगचे चांगले प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आत्मा, अपेडा, ईफिक्की, स्मार्ट प्रकल्प आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टच्यावतीने वायगाव हळदीची दुबई येथे निर्यात, विपणन व प्रसिध्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी, विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे, अपेडाचे विभागीय प्रमुख प्रशांत वाघमारे, ईफिक्कीचे अध्यक्ष युनिव्हर्सल एक्सपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण वानखडे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॅा.नलिनी भोयर, विदर्भ नैसर्गिक उत्पादक शेतकरी कंपनीच्या संचालक शोभाताई गायधने आदी उपस्थित होते.

वायगाव हळद दुबईला रवाना होत असतांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला अभिमान वाटत आहे. वायगाव हळद उत्पादक संघाने या हळदीचे भौगोलिक नामांकन मिळविले. समुद्रपुर तालुक्यातील 400 शेतकरी 160 हेक्टरवर या हळदीचे उत्पादन घेते. या शेतकऱ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन या हळदीच्या उत्पादनाकडे अधिकाधिक शेतकरी कसे वळतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांची टीम आंतरराष्ट्रीय बाजार तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी दुबई येथे पाठवण्यात येतील, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

वायगाव हळद जास्तीत जास्त निर्यात करण्या सोबतच विपणन साखळीतील मध्यस्थ कमी होणे देखील आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अधिक भाव मिळण्यासाठी थेट शेतकरी ते ग्राहक असा प्रयत्न करू, असे पालकमंत्री डॅा.पंकज भोयर म्हणाले.
एक जिल्हा एक उत्पादन या योजनेंतर्गत वायगाव हळदीला आपण जास्तीत जास्त ‘प्रमोट’ करतो आहे. अलिकडे बाजार तंत्र फार महत्वाचे आहे. त्यामुळे या हळद उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजिंग, मार्केटींग आणि अनुषंगीक बाबींचे चांगले प्रशिक्षण देण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रम घेऊ. हळद उत्पादक शेतकरी कंपन्यांची अपेडाद्वारे नोंदणी, हळदीचे क्षेत्र व उत्पादकतेत वाढ आणि थेट शेतकरी कंपन्या हळदीची निर्यात करू शकेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले.

यावेळी अपेडाचे विभागीय प्रमुख प्रशांत वाघमारे यांनी हळदीच्या निर्यातीसाठी शेतकरी कंपनीची अपेडा नोंदणी, ग्लोबल गॅप प्रमाणपत्र, ऑर्गेनिक प्रमाणपत्र, पॅक हाऊस, शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या गोष्टी महत्वाच्या आहे. मुंबईत होत असलेल्या प्रदर्शनांमध्ये वायगाव हळदीसाठी स्टॅाल उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले. युनिव्हर्सल एक्सपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण वानखडे यांनी हळदीच्या निर्यातीसाठी आपला पुढाकार राहिल. भविष्यात आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना येथे आणून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.

विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी बाजार तंत्र शिकले पाहिजे. असे सांगितले. प्रास्ताविकात आत्माच्या प्रकल्प संचालक डॅा.नलिनी भोयर यांनी भारत हा सर्वाधिक हळद निर्यात करणारा देश आहे. जिल्ह्यात 500 हेक्टरवर हळदीची लागवड होते. समुद्रपुर तालुक्यात 160 हेक्टरवर 400 शेतकरी वायगाव हळदीचे उत्पादन घेते. भौगोलिक नामांकन प्राप्त या हळदीच्या औषधी गुणकारी तत्वामुळे विशेष मागणी असते. जिल्ह्यातून प्रथमच ओल्या हळदीची निर्यात केली जात आहे. यासाठी अपेडा आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. सभागृहातील कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांच्यांहस्ते हिरवी झेंडी दाखवून दीड टन ओल्या हळदीची खेप नागपूरकडे रवाना करण्यात आली. तेथून हळद विमानाने दुबईला जाणार आहे.

शेतकऱ्यांचा सत्कार व धनादेश वितरण
समुद्रपुर तालुक्यातील तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून दुबईसाठी हळद घेण्यात आली. त्यानिमित्त वायगाव हळद शेतकरी उत्पादक कंपनीचे पंकज भगत, कृषोन्नती शेती उत्पादक कंपनीचे पितांबर भुमरे तर विदर्भ नैसर्गिक शेती शेतकरी कंपनीच्या शोभाताई गायधने यांना प्रत्येकी 75 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हळद निर्यातीसाठी योगदानाबद्दल आकाश डंभारे यांचा सत्कार करण्यात आला.

Tags: वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल: पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
Previous Post

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून खाण सुपरवायजरने केली स्वतःला पेटवून घेत आत्महत्या.

Next Post

वर्धा जिल्हात बालविवाहाने माजली खळबळ, पण यांनी होणारा बाल विवाह रोखला.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा जिल्हात बालविवाहाने माजली खळबळ, पण यांनी होणारा बाल विवाह रोखला.

वर्धा जिल्हात बालविवाहाने माजली खळबळ, पण यांनी होणारा बाल विवाह रोखला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In