भन्ते करुणा बुद्धज्योती महाथेरो यांचे हस्ते पंचशील ध्वजारोहन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
देसाईगंज येथे
सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे दीक्षाभूमी देसाईगंज येथे महा परित्राण पिठाचे आयोजन करण्यात आले होते.
करूणा, अहिंसा,समता मूल्यांचे प्रतिक असलेली व भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानबोधि आणि महापरिनिर्वाण हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग एकाच दिवशी घडलेली अशी वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा याचे अन्य साधारण महत्त्व बौद्ध अनुयायांना आहे.या प्रसंगांना १२मे २०२५ला २५६९ वर्षे लोटली.
भंते करूणा बुध्द ज्योती महाथेरो मोहगाव यांच्या हस्ते प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले पश्चात महा परित्राण घेण्यात आला. शुभ्र वस्त्रात भरपूर उपासक उपासकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली याप्रसंगी खिरदान वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज च्या अध्यक्षा कविता मेश्राम, सचिव ममता जांभूळकर उपाध्यक्ष श्यामला राऊत सल्लागार मारोती जांभूळकर तसेच डॉ संजय मेश्राम,चंदुराव राऊत,दुधराम शेंडे,गायत्री वाहाणे, सरीता बारसागडे, प्रतिभा बडोले, दुर्गा रंगारी, आशा रामटेके, जयश्री लांजेवार, लीना पाटील, प्रतिमा शेंडे, मंदा शिंपोलकर, रश्मी गेडाम यांनी परिश्रम घेतले.

